एस. एस. सी. एन. प्राथमिक शाळेच्या पालकांसाठी पालक अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक २५/४/२०२३ मंगळवार रोजी प्राथमिक शाळेच्या पालकांसाठी सैनिक शाळेच्या सभागृहात पालक अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा एस. एस. सी. एन. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता लेनगुरे मॅडम यांच्या भाषणाने झाली. तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या ए.एस.पी रीना जनबंधू आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी यासाठी पालकांसोबत एकत्र काम करण्याचा महत्त्वाचा पुनरुचार केला. व शाळेचे कौतुक केले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग प्रमुख राशी गोयल व प्रियंका टुकरेल यांनी CCE प्रणाली वर सादरीकरण केले व तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख करून दिली. आणि CBSE ने दिलेल्या सर्व नवीनतम CCE निर्देशांकाबद्दल पालकांना माहिती दिली. अशा प्रकारे पालक शिक्षक सभेने व अल्पपोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.