ब्रेकिंग :- अखेर त्या झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक! मुख्य सूत्रधार कोण?crime chandrapur
ब्रेकिंग :- अखेर त्या झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक! मुख्य सूत्रधार कोण?
                                                         

, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ.  
      पोलिसाचे नव पथक लागले होते कामाला.

    दिनचर्या न्युज :-                                   

चंद्रपूर:-मूल येथील काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत (Santosh Ravat) यांच्यावर आज अज्ञात इस्मानी गोळी  गोळीबार   केला होता. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली. राजकिय खळबळ उडाली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष राऊत यांच्यावरील आज झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज पुढे  आले होते त्या आधारे चंद्रपूर  पोलिसांनी  आरोपीच्या मार्गावर नव पथक तयार करून त्यांचा तपास सुरू केला होता. अखेर पोलिसांना त्या गोळीबार प्रकरणासंदर्भात दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे.

  मागील काही वर्षात जिल्ह्यातील  राजकीय गुंडगिरीला उधाण आले असून अवैध व्यवसायात असणाऱ्या सर्व गुंड प्रव्रुत्तिच्या लोकांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे चित्र दिसत आहे, अशातच सीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारांची चर्चा सुरू असतांना यामागे राजकीय ताकत आहे असा कयास लावला गेला होता, आता त्या चर्चेचे सत्य समोर आले असून बाबुपेठ येथील काँग्रेस समर्थित दोन भाऊ या गोळीबारातील आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर  आली आहे. काल अटक करण्यात आलेल्या या आरोपींना दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले असल्याची  विशेष सूत्रांकडून माहिती समोर आहे.                                      
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जवळपास नऊ पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेला पाठवून वेगाने  तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान जे क्रिमिनल माइंड चे व खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे अशा  गुंडांची वेगवेगळ्या पद्धतीने कसून चौकशी केली होत. या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकच्या अध्यक्षाच्या गाडीचा ड्रायवर याला सुद्धा  तपासात घेतले होते     .                                         
  संतोष रावत यांच्यावर गोळीबार झाला त्यामागची कारणे आता समोर येणार असून त्यात बैंक भरती करिता पैसे दिले, पण नौकरी मिळाली नाही आणि म्हणून आम्ही हल्ला केला असेही कारण आरोपी कडून येण्याची शक्यता आहे. हा गोळीबार राजकीय वैमन्यशातून झाला असला तरी आरोपींना वाचविण्यासाठी मास्टरमाईंड किंव्हा त्यांचा सूत्रधार हा बैंकच्या व्यवहारांची कारणे समोर करणार आहे. या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांची सुद्धा पोलीस चौकशी झाली होती यावरून पोलिसांचा तपास योग्य दिशेने जातं असल्याचे दिसत आहे. आता या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण याबाबत पोलीस लवकरच तपास लावणार आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात तो मास्टरमाईंड व सूत्रधार कोण ? यावर पडदा पडून बुरखा पांघरूण कटकारस्थान रचणाऱ्याचा असली चेहरा समोर येणार आहे.