पीडित परिवारातील मुलांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत घ्या,अन्यथा आत्मदहन, आमरण उपोषण करणार !
पीडित परिवारातील मुलांना अल्ट्राटेक सिमेन्ट कंपनीत घ्या,अन्यथा आत्मदहन, आमरण उपोषण करणार !ulttra.ci.chandrapur

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील आवारपुर येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी 1982 -83 पासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या लोडिंग च्या व इतर ठेकेदाराकडे पीडित परिवारातील व्यक्ती काम करीत होते. यातील काही मयत, प्याराँलाईस (लकवा) तर काही सेवानिवृत्त झाले. 
आवारपूर हे गाव दत्तक गावातील एक असून या गावातील महिलांनी आमच्या मुलांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत घेण्यात यावे अन्यथा आम्ही कंपनीसमोर आत्मदन किंवा आमरण उपोषण करू अशी घोषणा आज पत्रकार परिषदेत शीला धोटे, चेतना खाडे, शशिकला वनकर, सविता नारनवरे, प्रतीक्षा शंभरकर ,सौ. कांबळे
यांनी दिला आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या युनिट हेड श्रीराम पी एस त्यांच्याकडे वारंवार मागणी केली असता. ते चाल ढकलपणा करीत असून वेळ मारू धोरण अवलंबित आहेत. या संदर्भात कार्यालय समोर त्या आंदोलन यापूर्वी करण्यात आले कंपनी विरोधात उपोषण करण्याचे पुकारले असता. आम्हाला वेळोवेळी तोंडी आश्वासन देऊन तुमच्या मुलांना लोडर भरतीत घेऊ असेच बोलून पर जिल्ह्यातील बेरोजगारांना आपल्या सोयीनुसार सर्व नियम, अटी धाब्यावर ठेवून भरती केल्या .
आवारपूर सिमेंट वसाहतील मयत, प्यारालाईस(लकवा) व सेवानिवृत्त कामगाराच्या मुलांनी यापूर्वी टोकाची भूमिका घेतली होती. अशीच पूर्णावृत्ती होऊ शकते. या सर्व घटनेस कंपनी जबाबदार राहील. अशी पत्रकार परिषदेतून सांगितले.
आमच्या मुलांच्या इंटरव्यू सुद्या घेतल्या होत्या, परंतु यांना न घेता इतर जिल्ह्यातील 60,10,10 अशा तीन वेळा बेरोजगारांना समाविष्ट करण्यात आले. कंपनीकडून लागायचे असेल तर आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आमच्या मुलांना अल्ट्राटेक कंपनीत समाविष्ट करून घेतले नाही. तर आम्ही पीडित परिवार कंपनीसमोर आत्मदहन, आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. अशी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे.