हालाखीच्या परिस्थितीवर मात करीत समृद्धीने निट परीक्षेत 96% मिळविले, सर्वीकडून कौतुकांचा वर्षाव !





हालाखीच्या परिस्थितीवर मात करीत समृद्धीने निट परीक्षेत 96% मिळविले, सर्वीकडून कौतुकाचा वर्षाव!

कुटुंबात डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार - समृद्धी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये चांदेकर कुटुंब चंद्रपूर येथील माता नगर भिवापूर वार्ड वास्तव्यास आहे.
कुमारी समृद्धी प्रभाकर चांदेकर या विद्यार्थिनीने अतिशय जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर परिस्थितीची जाण ठेवून अभ्यास करीत निट परीक्षेत 96% घेऊन घवघवीत यश मिळवले. आई वडील मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा आनंद तिला आज मिळालेल्या निट परीक्षेतुन नाव रोशन केल्याने मनोगत तिच्या आईने व्यक्त केले.
तिचे मनोबल आणि पुढील भविष्याचा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिक सुनील खंडेलवाल, शैलेश जुमडे,  रवींद्र देशभ्रतार, उल्हास घटे, विकास मोरेवार, मित्रपरिवार यांनी समृद्धीच्या घरी जाऊन गुलदस्ता देऊन सत्कार केला. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर भविष्यात कुठलीही आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असे सांत्वनिक मनोबल वाढविले. समृद्धीने अभ्यासिकात जाऊन नेट परीक्षेचे अध्ययन केले. आता तिला समोर एमबीबीएस ला जायचे असून ती याचे श्रेय आपल्या कुटुंबातील आई-वडिलांना देत असून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.