वादळी पावसाने झाड अंगावर कोसळल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

वादळी पावसाने झाड अंगावर कोसळल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
कोरपना तालुक्यात आज दुपारी अचानक प्रचंड वादळी वाऱ्याचा पाऊस कोसळला. त्या वादळी पावसाने झाड कोसळल्याने वडगाव येथील महिलेचा मृत्यू झाला. ती दुसऱ्याच्या शेतात कामाला होती.
मूर्त महिलेचे नाव वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35) या महिलेवर अंगावर झाड पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही महिला गुलाब जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला गेली होती. आज 10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली तेव्हा झाड अचानक तिच्या अंगावर पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरात या घटनेने शोककडा पसरली आहे.