जिल्हा स्टेडियमवर खाजगी इलेक्ट्रॉनिक गाड्याची खुलेआम चार्जिंग , जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची मुख सहमती आहे का?





जिल्हा स्टेडियमवर खाजगी इलेक्ट्रॉनिक गाड्याची खुलेआम चार्जिंग , जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची मुख सहमती आहे का?

इलेक्ट्रॉनिक कार चार्जिंगच्या बिलाचा भुर्दंड
जिल्हा प्रशासनावर


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- जिल्हा क्रीडा संकुलनात इलेक्ट्रॉनिक कार चार्जिंगच्या बिलाचा भुर्दंड जिल्हा प्रशासनावर बसत असून येथे एका कर्मचाऱ्याने आपल्या इलेक्ट्रॉनिक कारला चार्जिंग करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून
येथील जिल्हा क्रीडा अधिकारी यांची मुख समिती तर नाही ना असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे.
बाजारात दुचाकी, चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. अनेकांनी वाहने घेतली आहेत. मात्र बिल येत असतानाही या वाहनांचे चार्जिंग पेट्रोलपेक्षा कमी असल्याने चंद्रपूर जिल्हा स्टेडियमच्या वरिष्ठ लिपिकाने हा खर्च वाचवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. गाडी घरी चार्ज केल्याने घराचे वीज बिल वाढते. त्यामुळेच या गृहस्थाने चंद्रपूर जिल्हा स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या भिंतीवर विजेचा फलक लावला असून, त्या ठिकाणी दररोज बेकायदेशीरपणे इलेक्ट्रिक कार पार्क करून वीजपुरवठा केला जातो. आणि हे सर्व जिल्हा क्रीडा अधिका-यांच्या आशीर्वादाने घडते की नाही हे माहीत नाही ? मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे हे निश्चित. शासनाच्या तिजोरीतून या गृहस्थांचे वीज बिल जिल्हा प्रशासन भरत आहे. या वरिष्ठ लिपिकाला चोरीचा आरोप लावण्याची परवानगी आहे का? आणि नसेल तर चोरीचे वीज बिल कोण भरणार?
वीजचोरी प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून वीज बिलाची संपूर्ण रक्कम वरिष्ठ लिपिकाकडून वसूल करून वीजचोरीप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मागील काही वर्षापासून जिल्हा क्रीडा संकुलनात अनेक कामे सुरू आहेत.या सुरू असलेल्या बांधकाम संदर्भात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार समोर येत असून याकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.