चंद्रपूर मनपा तर्फे " माझ्या शहरासाठी माझे योगदान " या थीमवर ही वॉर्डस्तरीय स्पर्धा




चंद्रपूर मनपा तर्फे " माझ्या शहरासाठी माझे योगदान " या थीमवर ही वॉर्डस्तरीय स्पर्धा


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने " सुंदर माझे उद्यान " व " सुदंर माझी ओपन स्पेस " या २ स्वतंत्र स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे.
" माझ्या शहरासाठी माझे योगदान " या थीमवर ही वॉर्डस्तरीय स्पर्धा होणार आहे.

संपर्क - स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख १० जुलै असुन स्पर्धेत भाग घेण्यास साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३, जितेश मुसनवार ८६६८७०८४३५ या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. तसेच मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल.

बक्षिसे -
प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
प्रोत्साहनपर - ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे

गुणांसाठी निकष : स्पर्धेत गुण प्राप्त करण्यास पर्यावरण पुरक वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे, उद्यान /ओपन स्पेस विकास समितीची स्थापना व कार्ये,सार्वजनिक स्थळ/उद्यानाचे सौंदर्यीकरण,लोकसहभाग,आरोग्यदायी उपक्रम,ओपन स्पेस/ बगिच्याची देखभाल,परिसराची स्वच्छता,केलेल्या कामाची प्रचार प्रसिद्धी,३ आर तत्वांचा वापर,जागेचे आरेखन करणे असे विविध निकष आहेत.

#UDD #urbandevelopment #urbandevelopmentdepartment #nagarvikasvibhag #chandrapurmunicipalcorporation #chandrapur #chandrapurcity #swachchandrapur #competition #citybeautification #cleancity #swachhsarvekshan

Maharashtra DGIPR Chandrapur Municipal Corporation