सावधान : पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना डेन्सिटी आणि दरात फरक तर नाही ना जरा तपासा ! ग्राहकांची होतोय फसवणूक!




सावधान : पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना डेन्सिटी आणि दरात फरक तर नाही ना जरा तपासा ! ग्राहकांची होतोय फसवणूक!

सेल ऑफिसरने कारवाई करण्याची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर शासन दर पत्रकानुसार ठरवून दिले आहे. पेट्रोल पंप धारक नियम धाब्यावर बसवून ग्राहकांची दिशाभूल करून
पेट्रोलपंपवर सर्रास ग्राहकाची लूट करित आहे. असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येतील महाकाली जिलिंग अँड प्रोसेसिंग फॅक्टरी भारत पेट्रोलियम या पेट्रोल पंप वर
डिस्प्ले बंद असून, डेन्सिटी 700kg/m3 असून पेट्रोल दर 106.19 असा आहे.
यात सर्रास शासनाची दिशाभूल करून ग्राहकांना लुटल्या जात आहे. नियमाप्रमाणे(density) डेन्सिटी 730 kg/m3 ते 750kg/m3 च्या वर असायला पाहिजे मात्र या पेट्रोल पंप वर कोणत्या भावाने पेट्रोल विक्री केल्या जात आहे. यांचे मशीनवर डिस्प्ले बंद असून यामागे पेट्रोल पंप मालकाचा ग्राहकांना लुटण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. ग्राहकांना दिलेल्या बिलामध्ये संबंधित पेट्रोल पंप ची माहिती डेन्सिटी, पेट्रोलचे दर देणे बंधनकारक असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसून सर्रास ग्राहकांची लूट पेट्रोल पंप धारक करत आहेत.
संबंधित विषयाबद्दल विचारणा केली असता तर, आमची सर्व माहिती ही रजिस्टर वर लिखित असते .असे म्हणून
येथील पेट्रोल पंप वरील मॅनेजर तुमच्याने जे बनते ते करा, कुठेही तक्रार द्या काही फरक पडणार नाही सर्व अधिकारी आमच्या खिशात आहे अशा प्रकारची उद्धट भाषा ग्राहकासोबत वापरली गेली.




या पेट्रोल पंपावर सेल्स ऑफिसर राईकवार काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.