24 जुलैला मणिपूर व चंद्रपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनेचा जन आक्रोश मोर्चा
24 जुलैला मणिपूर व चंद्रपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनेचा जन आक्रोश मोर्चा

मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मणिपूर येथे मागील दोन महिन्यापासून सामूहिक हिंसाचाराच्या घटनामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देश हादरून गेला आहे.
अशा घटनेमुळे देशाच नाहीतर जगात सुद्धा भारताची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच या हिंसक घटना उत्तरोक्त वाढतच चालल्या आहेत. अशातच का हिसक जमावणे दोन महिलांची सामूहिक नग्न धिंड
काढून त्यांच्यावर जे अमानवी अत्याचार केले. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेचा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकशाहीला व मानवाधिकार ला मानणाल्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात चंद्रपूरात सोमवारी दिनांक 24 जुलै 2023 ला बारा वाजता गांधी चौक महानगरपालिका परिसरातून मोर्चाचे आयोजन सर्वपक्षीय लोकशाही, मानवाधिकार, फुले- शाहू -आंबेडकरी समविचारी संघटना कडून जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा जटपुरा गेट ते मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर सभेत रूपांतर होईल. 
. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान आज पत्रकार परिषदेतून हिराचंदजी बोरकुटे,डाँ. अभिलाषा गावतुरे, बेबीताई उईके, वैशाली टोंगे, वनिता आसुटकर,डॉ.राकेश गावतुरे, सुनीलदादा पाटील, नितेश कुळमेथे, अनुताई दहेगावकर, कुसुम उदार, नरेंद्र गेडाम, यास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भारताचा नागरिक म्हणून आपण सर्वांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चात सहभागी व्हावे. मणिपूर येथील घटनेला 72 दिवसाच्या वर झाले असून मणिपूर राज्य सरकार येथील मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या प्रकरणावर तोडगा काढण्यास अपयशी ठरल्याने तसेच पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे, दखल न घेतल्याने ,आणि राजकीय पक्षाकडून हा घडवून आणलेला जातीय हिंसक ,माणुसकीला काळीमा फासणारा , घृणास्पद प्रकाराचा सर्व स्तरातून निश्चित व्यक्त होत आहे.

 तसेच चंद्रपूर शहरातील मेजर गेट ऊर्जानगर परवानाधारक आशा अरविंद जैसवाल यांच्या परवाना अंतर्गत चालत असलेल्या देशी दारूच्या दुकानात रविवार दी. 16 जुलै रोजी एक घटना उघडकीस आली. या बार ला लागून असलेल्या मुत्रिधरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर लावून त्याची विटंबना केली जात होती. हा भारतीय घटनेचे शिल्पकार व भारतरत्न असलेल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

उपरोक्त, दोन्ही मुद्दे अत्यंत संवेदनशील असून हे करणान्या समाजकंठकाना जरब बसवून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाही करावी, या हेतूने चंद्रपूर येथील सर्व लोकशाही व मानवी मूल्ये यांना मानणाऱ्या समविचारी सामाजिक संघटनांतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी "निषेध मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.