दर्डा पिता-पुत्राला न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली




दर्डा पिता-पुत्राला न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

दिनचर्या न्युज :-

दिल्ली (चंद्रपूर) :-

कोळसा घोटाळा प्रकरण दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय यांना मोठा दणका दिला आहे.
प्रकरणी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने बुधवारी विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली.विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (latest marathi news)

याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.


न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.