चंद्रपूर मध्ये पावसाचा कहर तूकूममध्ये अनेक घरांमध्ये पाणीच पाणी लाखोचे नुकसान





चंद्रपूर मध्ये पावसाचा कहर तूकूममध्ये अनेक घरांमध्ये पाणीच पाणी लाखोचे नुकसान

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरांमध्ये तीन ते चार दिवसापासून पावसाने कहर केल्यामुळे लक्ष्मी नगर सर्वे कॉलनी आश्रय कॉलनी वस्ती मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे घरातील जीवनावश्यक आणि महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान झाले महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या भागात नाल्यांचे बांधकाम निकृष्ट आणि बरोबर झाले नाही नगरपालिका आणि प्रशासन यांना त्यांनी ताबडतोब पंचनामा करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी एक सामाजिक कार्यकर्ते सौ शुभांगी डोंगरवार यांनी चंद्रपूर महानगर महानगरपालिके आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांना एका निवेदन द्वारे केली आहे तसेच काल रात्री एक वाजेपासून सतत पाऊस चालू असल्यामुळे आजही अनेकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता होती परंतु शुभांगी डोंगरवार यांनी ताबडतोब प्रशासनाला माहिती कळवली व लाईव्ह लोकेशन बघायला सांगितले लगेचच ॲक्शन घेण्यात आली व महानगरपालिका आणि प्रशासन द्वारे पाहणी करण्यास इंजिनिअर पाठवण्यात आले आणि लगेच जेसीपी पाठवून जी नाली बंद होती ती पाडण्यात आली व दोन्ही नाल्यांचे एकत्र जुळवून त्याचे रुंदीकरण वाढवून पाणी सप्लाय करण्यात आले वार्डातील लोकांनी तरी सर्व नागरिकांनी त्यांना संपूर्ण सहकार्य केले