घरी सोडून देतो म्हणून गाडीवर बसवले , जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केले

घरी सोडून देतो म्हणून गाडीवर बसवले , जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- प्रतिनिधी बल्लारपुर:
बल्लारपूर तालुक्यात दोन नराधमाने एक अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक
अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चांगला संताप व्यक्त केला जात आहे. आहे.
घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर 2 नराधमाने आळीपाळीने अत्याचार केला.ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही राजुरा तालुक्यातील केळझर येथे गेली होती. येथून ती आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाली असता ती बामणी फाट्यावर ऑटोची वाट बघत उभी असताना तिथे तिरुपती पोलादवार व मोरेश्वर जंपलवार हे दोघे आपल्या दुचाकीने मोटरसायकल ने आले. आमच्यासोबत चल तुझे पैसे वाचतील, असे आमिष देतत्यांनी तिला दुचाकीवर बसवले. आणि जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार वय 22 वर्ष, रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याचा वर भा. द. वि. 376,376ब व पोस्को 4,6 कलम लाउन बेड्या ठोकल्या आहे. तर दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार रा. केळझर, ता. राजुरा हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. बल्लारपूर पोलिसांनी नराधम आरोपी तिरुपती पोलादवार यांना बल्लारपुर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधीकारी दीपक साखरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्राची राजुरकर व त्यांची टीम करीत आहे.

चंद्रपुरात नेहमीच जंगल परिसर असलेल्या जंगलात रोड रोमिओ, नवयुवक मुल- मुली, प्रेमी युगल भ्रमण करण्याकरिता जात असतात. अशाच प्रकार काही दिवसापूर्वी लोहारा जंगलातील परिसरात घडला. जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या घटना पासून चंद्रपूर जिल्हा चांगलाच हादरला आहे. पोलीस विभागाने अशा प्रकारच्या घटना गांभीर्याने घेण्याची गरज आहे.