काही दिवसापासून ईडीच्या भीतीने अस्वस्थ असलेले नेते सरकार मध्ये गेले- शरद पवार




काही दिवसापासून ईडीच्या भीतीने अस्वस्थ असलेले नेते सरकार मध्ये गेले- शरद पवार

दिनचर्या न्युज :-
मुंबई (चंद्रपूर) :-
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो अध्यक्ष शरद पवार यांनी या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा नसल्याचे म्हटले.
त्यामुळे अजित पवार यांचं हे बंड असल्याचं स्पष्ट आहे. अजित पवारांनी बंड केला. प्रमुख म्हणून त्यांची भूमिका काही दिवसात ही शक्ती रूपात सामान्य माणूस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशे शरद पवार बोलले. नव्याने संघटनेची बांधणी करू ,गेले त्याची चिंता नाही. याचे सर्व श्रेय अर्धा वाटा हा मोदींचा आहे .त्यांचे आभार मानले. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यावर चौकशीची कुराड येईल असे म्हटले असता. तेव्हापासून ईडीच्या भीतीने गेलेले नेते अस्वस्थ होते. न्यायालयीन लढाई आम्ही लढणार नसून आम्ही पक्ष म्हणून जनतेत जाऊ. येत्या निवडणुकीत नवीन टीम दिसेल. दुसरी टीम शिल्लक राहिली नाही. आणि अपात्रेच्या 16 आमदाराचा निकाल लागणार नाही असे त्यांनी पत्रकार परिषद सांगितले. पक्षाची बांधणी, विचारधारा यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून यापूर्वी असे माझ्यासोबत पाच नेते असताना एवढी मोठी फौज निर्माण केली. त्याचे काही मला वाटत नाही. ही सर्व भूमिका मी जनतेसमोर मांडू. सहा तारखेला महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षाची बैठक बोलावली होती. त्या अगोदरच अजित पवार यांनी बंड केला. यापूर्वी 1986 ला 58 सदस्य असताना सर्व सोडून गेले त्यातील पाच माझ्यासोबत राहिले. तरी पक्षाची मूठ खंबीरपणे उभी केली. याचे सर्व परिणाम दोन-तीन दिवसात समोर येईल मला हे नवीन नाही. असे शरद पवानी माध्यमासमोर सांगितले.

अजित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीतचा मोठा गट फोडल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे मात्र अजित पवारांसोबत शपथविधी सोहळ्याला दिसून आले आहेत.
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांसारखे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेही अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले आहेत.

अजित पवारांसोबत या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली :

1) छगन भुजबळ राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांनी गेल्या दोन दशकात विविध मंत्रिपदं सांभाळली. ते आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दोन ते अडीच वर्षे तुरुंगातही होते. शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनचे ते सहकारी आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले भुजबळ नंतर पवारांसोबत राष्ट्रवादीची स्थापना करतानाही सोबत होते. मात्र, आता अजित पवारांसोबत ते बंडात सहभागी झाले आहेत.
2) दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असलेले दिलीप वळसे पाटील हे महाविकास आघाडी, तसं त्यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार असताना विविध मंत्रिपदी होते. शरद पवारांचे निकटवर्तीय अशी त्यांची राष्ट्रवादीत आणि राजकारणात ओळख आहे. आता तेही अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले आहेत.
3) हसन मुश्रीफ - कोल्हापुरातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. मुश्रीफ हे शरद पवार यांचे समर्थक मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामागे ईडीनं चौकशीचा ससेमिराही लावला होता. त्यावरून भाजपनं मुश्रीफ यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. मात्र, आता भाजपच्या सत्तेतच ते सहभागी झाले आहेत.

4) धनंजय मुंडे - गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा हात धरला. त्यानंतर राष्ट्रवादीत मंत्रिपदही त्यांना मिळालं. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणूनच त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे.
5) धर्मरावबाबा अत्राम - गडचिरोलीच्या अहेरीचे धर्मरावबाबा अत्राम हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
6) आदिती तटकरे - राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार असलेल्या आदिती तटकरे यांनी अजित पवारांच्या बंडात सहभाग घेतला आहे.

7) संजय बनसोडे - लातूरच्या उदगीरमधील राष्ट्रवादीचे
आमदादर संजय बनसोडे हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्रिपदी काम केलं होतं.
8) अनिल पाटील - जळगाव तालुक्यातील अमळनेर
मतदारसंघातून अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.