चंद्रपूरात राज्यातील पहिल्या फ्री चेक अप कॅन्सर गाडीचे लोकार्पण
चंद्रपूरात राज्यातील पहिल्या फ्री चेक अप कॅन्सर गाडीचे लोकार्पण

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

विजय किरण फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी बसचे (व्याहान )यांचे उद्घाटन माजी मंत्री, ,काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गांधी चौक येथे करण्यात आले.जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून हे कार्य हाती घेतले आहे.

फ्री चेक अप साठी जिल्ह्यातील जनतेला मोफत कॅन्सरचा इलाज व्हावा यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी आपल्याकडून जिल्ह्यासाठी कॅन्सर सारख्या आजारावर तुरंत उपाय व्हावा यासाठी पंधरा जुलैला सायंकाळी पाच वाजता गांधी चौकात फ्री चेकअप कॅन्सर गाडीचे लोकार्पण करण्यात आले. . सर्व सुविधायुक्त असलेली ही गाडी फ्री चेक अप साठी राहणार आहे. या गाडीतच फर्स्ट ट्रीटमेंट, बॉडी स्कॅनिंग होणार आहे. संपूर्ण सोयी संयुक्त कॅन्सर गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकासाठी उपलब्ध होत आहे. ही गाडी आरोग्य कॅम्प जिथे असतील तिथे पाठवली जाईल. जिल्ह्यात वाढते कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता आपण या गाडीची व्यवस्था केल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. फर्स्ट स्टेजवर असलेल्या कॅन्सर रुग्णाला, डिटेक्ट होणे या गाडीचा फायदा होईल. अशी माहिती आज लोकार्पण सोहळ्यातून त्यांनी दिली.

चंद्रपूर शहरात ही व्हॅन पंधरा दिवस प्रत्येक प्रभागात फिरून कॅन्सरग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी तपासणी केली जाईल. जर रुग्ण आढळल्यास त्याचा पूर्ण खर्च विजय किरण फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येईल. जिल्ह्यात आतापर्यंत पाचशेच्या वर कॅन्सर ग्रस्त रुग्णांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
बिकट परिस्थितीत या आजाराला कसे सामोर जावे लागते हे आम्ही स्वतःच्या कुटुंबावर अनुभवले तेव्हा वाटले, कॅन्सर सारख्या रोगाला किती भयानक वेदना सहन करावा लागतात.
गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुटक्याचा प्रमाण तंबाखूचे प्रमाण खूप जास्त वाढलेला आहे .अशा वेळेस कॅन्सर झाला तरी डिटेक्ट होत नाही. आजूबाजूचा विचारून घेतात घरचे उपाय करून घेतात. पण जातात का हॉस्पिटलला नाही, महिलांमध्ये गर्भाशयाचा जास्त कॅन्सरचा प्रमाण वाढलेला आहे.
पहिल्या स्टेजला डिटेक्ट झाली तर कुठे ना कुठे त्याचा सोल्युशन निघू शकते .कुठे ना कुठे तो व्यक्ती बरा होऊ शकतो.
एक फिरती रुग्णवाहिका ज्यामध्ये कॅन्सरचा पहिला स्टेजमध्ये डिटेक्ट होईल ज्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांना वाचवू शकेल. हा आज आपल्या समोर त्यांनी ते विचार तेव्हा केला होता .आणि आज आपल्या समोर त्यांनी हा विचारच  पूर्ण  केल्याचा अभिमान असल्याचे युवा नेत्या  शिवानी  वडेट्टिवार  त्यांनी  प्रास्ताविकातुन  केला.
  राजुरा विधानसभा  क्षेत्राचे आमदार, तथा नवनिर्वाचित ग्रामीण अध्यक्ष सुभाष धोटे यांनी या उद्घाटन सोहळ्यात निमित्य बोलताना म्हणाले  विजुभाऊ हे राष्ट्रसंताचे भक्त असून नाही मी आपल्या वाचनातून राष्ट्रसंताचे विचार मांडतात.विजय त्यांच्या नावातच विजय दडलेला आहे असून ते तदावार नेता म्हणून   त्यांची ओळख आहे. राजकारणात अशा प्रकारची कृती करणे हे फार ईश्वरीय कारण असून  ते संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशा कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी लहान तयार केले असून, याची दखल राष्ट्रीय स्तरावर  व्हावी असे ते बोलले.

कॅन्सरग्रस्त रुग्णांनी खास करून महिलांनी याकडे परिवाराच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष करून,  दुखण्याची कलरची गोडी घेऊन   तात्पुरत्या स्वरूपात आराम करत असतात. हळूहळू त्याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो मग, हाताबाहेर गेलेल्या रुग्णांना वाचवणे कठीण जाते. म्हणून या रुग्ण  व्हॅनचा  प्रथमोपचार निदान करून आपल्याला 99% रुग्णाचा जीव वाचवण्यात येईल.
आम्हाला वाटतं की आपण माणसाची सेवा केली तर ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सेवेतूनच ही शक्ती मिळाली असून आज राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत जाण्याची संधी आपणच दिली.  हे जनतेचे प्रेम आहे. माझ्या दारात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी कधीही वापस पाठवत बसून फुल नाही फुलाची पाकळी त्याच्या पदरात माझ्या कुटुंबातून जाते. हीच खरी सेवा आहे.  तशी शिकवणही मी माझ्या मुलांना दिली आहे. पैसा लोभ माया हा सर्व गोष्टी जनसेवातूनच मिळतात. म्हणून जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आपल्यासमोर आज सव्वा दोन कोटीची    व्हेन कॅन्सरग्रस्त  रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील  हा पहिलाच प्रयोग आहे. यामुळे  जनतेच्या चेहऱ्यावरील  आनंद हा आपला आनंद असेल असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी कॅन्सर ग्रस्त लोकांसाठी फ्री चेक अप गाडीचे लोकार्पण  सोहळात ते बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेसचे अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

 


 
   आ. विजय वडेट्टीवार केले
राज्यातील पहिल्या फ्री चेक अप कॅन्सर गाडीचे लोकार्पण