तलाठी लटकला 11000 ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात chandrapur acb

तलाठी लटकला 11000 ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांची कारवाई

दिनचर्या न्युज :- 
चिमूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका येथील साजा
म्हसली येथील तलाठी राजु विठ्ठल रगड, वय - ५६ वर्ष यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी पाच वाजता दरम्यान चिमूर, आदर्श कॉलनी येथील कार्यालयात ११००० रु ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. तलाठी रगड यांचेकडे तालुक्यातील अडेगाव(देश.) येथील अतिरिक्त कारभार असल्याची माहिती आहे. वृत्त लिहिपर्यंत पो. स्टे. चिमूर येथे लाचलुचपत विभागाची कारवाही सुरू होती.