चिमूर अतिरीक्त जिल्हा नाही, स्वतंत्र जिल्हा करा? : गजानन बुटके


ना. वडेट्टीवारांनी चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध केला नसुन, समर्थनच!

चिमूर अतिरीक्त जिल्हा नाही, स्वतंत्र जिल्हा करा? : गजानन बुटके


दिनचर्या न्युज :-
चिमूर -
चिमूर स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या पाच दशकांपासून विविध राजकिय पक्ष, व्यापारी तसेच लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली आहेत. गेल्या काही दिवसापासुन सत्ताधारी चिमूर अतिरिक्त जिल्हा घोषित करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, चिमूर तालुक्यातील जनतेची स्वतंत्र जिल्ह्याची मागणी असतांना अतिरिक्त जिल्हा देणे म्हणजे जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. चिमुरकरांना अतिरिक्त जिल्हा नको असुन "चिमूर क्रांती" हा स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य गजानन बुटके यांनी चिमूर येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतुन केली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया ऐवजी "चिमूर क्रांती" हा नवीन जिल्हा निर्मीत करून जिल्हाधिकाऱ्यांची नेमनुक का करण्यात आली नाही ?

गेल्या १० वर्षापासुन सत्तेतील आमदार, खासदार येथे प्रस्थापीत आहेत. त्यांचे कडुन जिल्हा निर्मीतीसाठी कोणताही प्रयत्न झालेला नाही.

गेल्या काही वर्षा अगोदर चिमूर विधानसभा क्षेत्रात भिसी ग्रा प ला अप्पर तालुका फक्त शासन स्तरावर घोषीत करून ठेवण्यात आले. त्या कार्यालयात नावापुरते कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात तेथे सामान्य नागरीक, शेतकरी, कामकरी, कष्टकरी व विध्यार्थ्यांचे कोणतेही काम होत नाही. साधे उत्तपन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा त्या अप्पर तालुका कार्यालयात भेटत नाही.

प्रत्येक १६ ऑगस्ट ला सरकारचे मंत्री, उपमुख्यमंत्री चिमुरात येतात. त्यांनी चिमुर जिल्हा का घोषीत केला नाही ? सध्या राज्यात भाजप शासीत सरकार आहे व केंद्रातही. मात्र, घोषणा करून जिल्हा अमंलात आणण्यासाठी वेळ का लागतो ?

चिमूर ला अतिरिक्त जिल्हा घोषित करतांना नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही येथील जनतेच्या भावना लक्षात घेऊन या तालुक्यांचा समावेश या नवनिर्मीत अतिरिक्त जिल्ह्यात करु नये अशी भुमीका महाराष्ट्र विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात घेतली आहे. यावरुन विरोधकांनी नामदार वडेट्टीवारांच्या विरोधात समाज माध्यमावरून चिमूर परिसरात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नामदार वडेट्टीवारांनी संबंधीत तालुक्यांचा समावेश करु नये याचा अर्थ स्वतंत्र चिमूर जिल्ह्याच्या मागणीला विरोध होत नाही; असेही गजानन बुटके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी बुटके यांचेसह कृ. ऊ. बा. समिती, चिमूर चे संचालक भरत बंडे, काँग्रेसचे माजी अल्पसंख्यांक अध्यक्ष जावाभाई शेख, काँग्रेस कार्यकर्ता सुधीर जुमडे, शुभम बोबडे आदी उपस्थित होते.