पं. समिती सिंदेवाही येतील कृषी अधिकारी करतात शासकीय वाहनाचा खाजगी कामासाठी गैरवापर ! कठोर कारवाईची मागणी




पं. समिती सिंदेवाही येतील कृषी अधिकारी करतात शासकीय वाहनाचा खाजगी कामासाठी गैरवापर ! कठोर कारवाईची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या पंचायत समिती शिंदेवाही येथील कृषी अधिकारी असे 'महाराष्ट्र शासन' लिखित असलेल्या वाहन नंबर MH 12 KN 8926 असलेले शासकीय वाहन असून या वाहनाचा उपयोग शासकीय कामाचा गैरफायदा घेऊन आपल्या खाजगी कामासाठी कृषी अधिकारी शिंदेवाही यांनी रविवारची सुट्टी परिवारासोबत आनंदात साजरी करण्यासाठी शासकीय गाडीचा गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या शासकीय वाहनाचा खाजगी कामाकरिता वापर करणे हा शासनाच्या तिजोरीची सर्रास उधळपट्टी करणे होय. शासकीय कामाचे दौरे दाखवून अधिकारी शासनाच्या वाहनाचा खाजगी कामासाठी उपयोग करतात. यामुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भू दंड बसतो.
संबंधित कृषी अधिकारी ढोंगळे यांना विचारणा केली असता. सुरुवातीला त्यांनी टाळण्याचे प्रयत्न केले. म्हणाले ड्रायव्हरने काय केले माहित नाही. परंतु परत पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ती गाडी आमचीच असून बटरफ्लाय येथे पारिवारिक पिकनिक साठी नेल्याचे मान्य केले.
पंचायत समिती शिंदेवाही येथील बिडीओ सूत्रे साहेब यांना याबाबत विचारणा केली असता. ही गाडी आमची नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या गाडीवर आपल्या कार्यालयाचा 'महाराष्ट्र शासन' पंचायत समिती कृषी अधिकारी सिंदेवाही म्हणून स्पष्ट असे नेम प्लेट लावण्यात आले असल्याचे दिसून येते. अशा वाहनाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याने आपल्या विभागाच्या नावाचा उपयोग करत असेल तर कठोर कारवाई करणे बंधनकारक आहे.
जर असे असताना सुद्धा या अधिकाऱ्याची पाठ राखण करणे, संबंधितावर कारवाई करण्याचे टाळणे, म्हणजेच आपल्या कर्मचाऱ्यांना मूक सहमती देणे होय?
अशा अधिकाऱ्यांनी वाहनाचा गैरवापर करण्यात आल्याची चौकशी करून संबंधित वाहनावर शासनाचा किती खर्च होतो त्यानुसार संबंधित अधिकाऱ्याकडून संपूर्ण खर्च वसूल करून, अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. या कृषी अधिकाऱ्यावर मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर काय कारवाई करतात याकडे नागरिकाची लक्ष लागले आहे.