29 तारखेलाच्या बैठकीला डुप्लिकेट ओबीसी बोलविले! उपोषण, आंदोलन, रस्त्यावर उतरणाऱ्याना वगळले -विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार vijay Wadattiwar virodhi....




29 तारखेलाच्या बैठकीला डुप्लिकेट ओबीसी बोलविले! उपोषण, आंदोलन, रस्त्यावर उतरणाऱ्याना वगळले
-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मराठा समाजाला ओबीसी समाविष्ट करू नये यासह अनेक मागणीसाठी मागील 17 दिवसापासून चंद्रपूर जिल्हा कार्यालय समोर रवींद्र टोंगे, अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. तरीपण त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले. आतापर्यंत चंद्रपुरात महामोर्चा, जीआर ची होळी, मुंडन आंदोलन, प्रतीकात्मक प्रेतयात्रा, चक्काजाम आंदोलन, यानंतर 30 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय ओबीसी महासंघ ,ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटना यांनी घेतला आहे.असे विविध आंदोलन करून सुद्धा मूक बधिर सरकारला कुठलीही जाग आलेली नाही. ओबीसीच्या संविधानिक मागण्याकडे सरकार दुर्लक्ष केल्याने ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारची 29 तारखेला डुप्लिकेट ओबीसी असलेल्या नेत्यांची बैठकीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कळाळून टीका केली.
ते म्हणाले, राज्यात ओबीसीच्या प्रश्ना संदर्भात सर्व पक्षीय बैठक बोलावली पाहिजे होती. परंतु हे तिघडी सरकार ज्याप्रमाणे मराठी समाजाला सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. तसे ओबीसींना न बोलवता मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार पुरस्कृत लोकांना बोलावून एकदा नव्हे तर चारदा वेगवेगळे पत्र काढून सरसकट ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी नेत्यावर अन्याय सरकार करीत असून, यांना ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यावर गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी पत्रकार परिषदेतून केला.
ते म्हणाले राज्यात गोंधळलेल सरकार आहे. त्यामुळे या नव्या सरकारचा गोंधळ सुरू आहे. राज्यात ओबीसी नेते, विरोधी पक्ष नेत्याला ही कसे काय डावलू शकतात असा सरसकट प्रश्न ? सरकारवर केला. ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवायचे आहे तर कुठल्याही समाजाच्या नेत्यावर अन्याय होता कामा नये. या ठिकाणी सरकारची भूमिका स्पष्ट दिसून येते की सरकारचा ओबीसींना फसवण्याचा कुठलातरी वेगळा डाव आहे. म्हणून या बैठकीला भाजप प्रणित नेत्याना बोलवून कुठलातरी वेगळा प्लॅन हे सरकार करीत आहे. म्हणून बैठकीला भाजपाने जावे, पण इतर आणि त्या बैठकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. जोपर्यंत सर्वपक्षीय बैठक होत नाही तोपर्यंत कुणीही जाऊ नये. असे आवाहनही वडेट्टिवारानी केले.
या बैठकीला सर्वात पहिले अधिकार आहे तो, आंदोलन करते, उपोषण करते, आणि रस्त्यावर उतरतात त्या नेत्यांना बोलावले पाहिजे पण इथे तसे न होता, जे कधी रस्त्यावर उतरत नाहीत, कधी ओबीसी म्हणून समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समोर आले नाही अशा भाजप प्रणित नेत्यांना बैठकीला प्राचारण केल्याने विरोधी पक्षनेते यांनी निषेध केला आहे.

रितेश राणीने केलेल्या वक्तव्यावर!

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले, राणे सोबत काँग्रेसमध्ये सोबत आलो. तेव्हापासून मी काँग्रेसमध्येच काम करीत आहे. परंतु मंत्रिमंडळात मंत्री पद पदासाठी मी लाचार नाही. रितेश राणे यांनी पहिल्यांदा मंत्रिमंडळात मंत्रि व्हावे मग दुसऱ्याचे बावडे उडवून दुसऱ्याची बदनामी करावी. मी काँग्रेस पक्षातच आहे माझ्यावर पक्षश्रेष्ठीने जो विश्वास केला ते विश्वास प्रामाणिकपणाने पार पडते. अशा भिकारचोट आवाहानाला प्रतिसाद देणारा कार्यकर्ता नाही. त्यांनी कुठली भूमिका स्वीकाराची तो त्यांचा प्रश्न आहे. मी बहुजनाच्या लढ्यासाठी काम करतोय! या राज्याला उदोगतीला नेणाऱ्या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी सक्षमपणे उभा आहे. सत्तेची हाव नाही, किंवा मी कुणाची चाटूगिरी करणार नाही. कार्यकर्ता म्हणून मी आहे कशाची पर्वा करीत नाही. असे रोखठोक उत्तर विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी रितेश राणेच्या बावळट केलेल्या प्रश्नावर केले.

पंकजा मुंडेच्या कारखान्यावर कारवाई एक शळयंत्र!

ओबीसी बहुजनातील नेता म्हणून गोपीनाथजी मुंडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते बहुजनाचे नेते होते. मात्र पंकजा मुंडे यांनी माझ्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे वक्तव्य केले आणि या मनुवादी संस्कृतीच्या लोकांना ते पटलं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला  नेत्यांनी पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू केले. पहिला प्रयोग त्यांच्या  कारखान्यावर कारवाईचा बडगा आणून सुरुवात केली.  भारतीय जनता पार्टीत अनेक  नेत्यांकडून काम करून घेतात आणि फेकून देतात. अशी पद्धत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपुरात 17 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या ठिकाणी प्रसार माध्यमांना सांगितले