गडपिपरी गावात जंगली डुकराने मांडला ठिय्या, गावातील नागरिकात भीतीचे वातावरण




गडपिपरी गावात जंगली डुकराने मांडला ठिय्या,
गावातील नागरिकात भीतीचे वातावरण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्र असलेल्या भिसी बीटातील गडपिपरी या गावात वन प्राण्याने हौदोष मांडला आहे. गाव जंगलाला लागून असलेले अनेक हिस्तप्रसूचे वावर गावात होत असते. त्यामुळे गावातील नागरिकांना शेतीच्या नुकसानिसह अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. या गावात एका रानटी डुकराने गावात अनेक दिवसापासून थैमान मांडले आहेत. त्यामुळे गावातील नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. या डुकरामुळे नागरिकाच्या जीवास धोका निर्माण झाला. गावातील बालकासह, नागरिकासही कुठल्याही सनी या डुकरामुळे मोठी हानी होण्याचे नाकारता येत नाही.
जंगली डुक्कर गावात येत असल्याने गावातील नागरिका भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डुकरामुळे गावातील नागरिकाच्या जीवित आज धोका झाल्यास संपूर्ण जबाबदारी ही वन विभागाची असेल. म्हणून संबंधित वन विभागाने या डुकराचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा या डुकराच्या जीवास गावकऱ्याकडून काही अपहार्य घटना घडल्यास गावकरी जबाबदार राहणार नाहीत.
एवढेच नाही तर माकडाच्या टोळीने सुद्धा या गावात शिरकाव केल्याने गावातील नागरिकांच्या घरांचे नुस्कान होत आहे. वानर गावात येत असल्याने गावातील फळ ,फूड झाडे, गावातील लहान बालकावर वानर धावून जात आहेत. कुठल्याही क्षणी, हे वानर मानव जीवितास धोका असू शकतात.
गावात मोठे नुकसान करीत आहे. म्हणून या वानराचाही बंदोबस्त करावा.
दुर्घटना होण्याच्या अगोदर या डुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.