जेसीबीने तलावाचा सिमेंट बंधारा फोडून लावला मातीचा लेप! झेडपी अधिका-यांनी केली तक्रार!





जेसीबीने तलावाचा सिमेंट बंधारा फोडून लावला मातीचा लेप! झेडपी अधिका-यांनी केली तक्रार!


पोंभूर्णा येथील प्रकार

चंद्रपूर :
मृद व जलसंधारण विभागाने पोंभुर्णा येथील एका तलावावर सिमेंटचा सांडवा (बंधारा) बांधला. मात्र, मागील महिन्यात संततधार पावसामुळे बंधारा फुटला. यानंतर अज्ञातांनी जेसीबीच्या माध्यमातून मातीचा ढिगारा उभा करून येथे सिमेंट सांडवा होता की, नव्हता असे चित्र निर्माण केले. सिमेंट बंधारा फोडून जेसीबीने मातीचा लेप लावला!
या प्रकारानंतर मात्र जिल्हा परिषद जलसंधारण विभागातील अधिकारी जागे झाले आणि अज्ञाताचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलिसांनी शासकीय पत्र आणण्याचे बजावले आहे. त्यामुळे आता अधिकारी या कामात गुंतले आहे.

जिल्हा परिषद जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पोंभुर्णा येथील तलावात मृद व जलसंधारण विभागाने सिमेंटचा बंधारा तयार केला. या बंधाऱ्यातुन पाणी वाहून जात होते. मात्र, मागील महिन्यात हा सांडपा फुटला आणि सिमेंटचे पिल्लर इतरत्र विखुरले. यानंतर अज्ञाताने माती टाकून सांडवा बुजविला.याची कुणकुण पौभुण्यात होताच अधिका-याची धावपळ सुरू झाली.

पाऊस कोसळल्यास होणार धोका
सिमेंटचा बंधारा फुटल्यानंतर त्यावर माती ढीग उभारला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत पाऊस कोसळल्यास या सांडव्याचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
झालेला प्रकार लपविण्याचा प्रयत्न ?
तलावातील सांडवा फुटल्यानंतर पाणी वाहून गेले. मात्र, अज्ञातांनी संपूर्ण सांडव्यावर माती टाकून बांध उभा केला आहे. जेसीबीने तलावाचा बंधारा फोडून मातीची पाळ तयार करताना गावातील अनेक लोकांना माहित असताना सुद्धा त्या जेसीबी मालकावर कारवाई कधी? 
 यामुळे मात्र उलट-सुलट चर्चाना पेव फुटले आहे. या मागचे नेमके कारण काय, हे आता तफासात समोर येईल की, यात संबधीत विभागाची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न तर नाही. ही चर्चा सुरू आहे.

येथील तलावाचा सिमेंट बंधारा (सांडवा) वाहून गेल्यानंतर अज्ञाताने शासकीय परवानगी न घेता माती टाकून बुजविला आहे. पोलिसांनी प्रशासकीय पत्र आणण्यासंदर्भात सांगितले आहे.
 याबाबत अधिक चौकशी सुरु आहे.

-प्रियंका रायपुरे, जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर