प्रकरण अलगट येताच गौण खनिज तस्करांनची मिटिंग, पंधरा कोटींपेक्षा जास्त महसूल बुडविणाऱ्याना संरक्षण कुणाचे ? chandrapur mhasul


प्रकरण अलगट येताच गौण खनिज तस्करांनची मिटिंग, पंधरा कोटींपेक्षा जास्त महसूल बुडविणाऱ्याना संरक्षण कुणाचे ?


ऐन वेळेवर पटवारी सुट्टीवर का ? 15 कोटींपेक्षा जास्त महसूल बुडविणाऱ्याना संरक्षण कुणाचे ?

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :-
    जिल्ह्यातील अवैध रेती व अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात अग्रेसर काँग्रेस चे नेते तथा ट्रांसपोर्टर शामकांत थेरे यांचा गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक उपविभागीय अधिकारी यांनी पकडला असता त्यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला असल्याचे समोर आले आहे, दरम्यान ज्या ठिकाणाहून हे गौण खनिज उत्खनन करण्यात आले त्यांचे मोजमाप करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी तहसीलदार भद्रावती यांना दिले होते व तहसीलदार सोनूने यांनी मंडळ अधिकारी यांना ही कामगिरी दिली होती, नायब तहसीलदार भांदककर हे काही दिवसांतच सेवानिवृत्त होत॑ आहे त्यामुळे त्यांनी  मंडळ अधिकारी व पटवारी यांना  मोजमाप करण्याचे सांगितले व त्यांनी मोजमाप केले पण ते आक्षेपार्ह असल्याने त्याचे पुन्हा  मोजमाप करण्याचे आदेश तहसीलदार यांनी नायब तहसीलदार भांदककर यांना दिल्यानंतर ते शुक्रवारला घटनास्थळावर येऊन प्रत्यक्ष मोजणी करणार होते परंतु  कार्यालयीन कामकाज असतांना अचानक पटवारी यांनी रजा घेऊन मोजमाप करण्याचा कार्यक्रम लांबवर नेला कसा हा गंभीर प्रश्न असुन आरोपी यांना काही वेळ देऊन हे प्रकरण थांबविण्याची संधी त्यांना दिली गेली तर नसावी असा प्रश्न असुन काही आरोपी हे नायब तहसीलदार भांदककर यांच्या वार्डात राहतात त्यामुळे हे प्रकरण सेट् केले जाऊ शकते अशी सुद्धा शक्यता नाकारता येतं नाही.


अवैध गौण खनिज उत्खनन हे निर्णायक मोडवर आले असुन शुक्रवारी नायब तहसीलदार भांदककर हे प्रत्यक्ष मोजमाप करणार या करिता पत्रकार प्रतिनिधी घटनास्थळी दाखल होणार होते व त्यामुळं खरा आकडा समोर येणार होता पण पटवारी अचानक सुट्टीवर गेल्या आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे, दरम्यान शमाकांत थेरे यांच्यावर 15 कोटिपेक्षा जास्तीचा दंड महसूल विभागाकडून आकारला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असतांना त्यांच्या सोबत जे इतर ट्रांसपोर्टर आहे त्यांच्यावर पण संयुक्त दंड बसू शकतो त्यामुळे आता सगळे रेती व गौण खनिज उत्खनन करण्याच्या कामात गुंतले आहे ते सर्व एकत्र येऊन पत्रकार व प्रशासन यांच्यावर दबाव बनविण्याचा प्रयत्न ते करणार असल्याची माहिती असुन या संदर्भात त्यांची एक संयुक्त बैठक झाल्याची पण माहिती आहे, आता हे प्रकरण रेती व गौण खनिज माफिया यांच्या अंगलट आल्याने व कोट्यावधी रुपयांचा दंड त्यांच्यावर आकाराला जाऊ शकतो व त्यांच्या मशीन व ट्रक जप्त केले जाऊ शकतात अशी शक्यता असल्याने ते पुढील काय घडामोडी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.