भोयेगाव वासी संदीप कोठारीच्या डांबर प्लांट च्या प्रदूषणाने त्रस्त- सरपंच शालिनीताई बोंडे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील भोयेगाव गाव हे धानोरा गडचांदूर मार्गावर असून या गावात मागील दहा वर्षापासून संदीप कोठारी यांचे डांबर प्लांट असून या डांबर प्लांटच्या घातक प्रदूषणामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एवढेच नाही तर लहान मुला बाळापासून वृद्धांपर्यंत अनेक आजाराने ग्रस्त झाले आहेत.
संबंधित डांबर प्लांट मालकाला वारंवार तक्रारी देऊनही तो प्लांट हटवायला तयार नाही. या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शेतीतील मालाचे नुकसान होत असून प्लांट मालक या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. या संदर्भाची माहिती आम्ही आता पालकमंत्र्याला दिली असून संबंधित प्रदूषण विभागाला याबाबतची तक्रार करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार. अन्यथा मी सरपंच शालिनीताई बोंडे आणि गावातील नागरिकाना घेऊन या डांबर प्लांट च्या विरोधात जन आंदोलन करू असे त्यांनी आज संबंधित माध्यमांना सांगितले.
याबाबतची माहिती संबंधित डांबर प्लॅन मधील मॅनेजर फुलझेले याला विचारणा केली असता. तो उलट तुम्ही छापून टाका! आमचे आतापर्यंत गाव वाल्याने काहीही वाकडे केले नाही तर तुम्ही बातमी टाकून काय वाकडे करणार! असा उद्धट सवाल माध्यमांना केला. संबंधित प्रदूषण विभागाचे अधिकाऱ्यांनी या डांबर प्लॅन मधून होत असलेल्या प्रदूषणावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.