आमदार किर्तीकुमार भांगडीयाचे अवैध धंद्द्याकडे दुर्लक्ष का? जनतेचा प्रश्न! सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ देतात अवैद्य धंद्याचा पुरावा ? पण कारवाईचे काय? आमदार का करीत नाही कारवाईची मागणी? चिमूर तालुक्यात अक्षरशः अवैद्य धंद्यांना उधान..!



आमदार किर्तीकुमार भांगडीयाचे अवैध धंद्द्याकडे दुर्लक्ष का? जनतेचा प्रश्न!


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ देतात अवैद्य धंद्याचा पुरावा ? पण कारवाईचे काय?


आमदार का करीत नाही कारवाईची मागणी?


चिमूर तालुक्यात अक्षरशः अवैद्य धंद्यांना उधान..!

दिनचर्या न्युज :-
चिमूर प्रतिनिधी :-

आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या कार्यकाळात,”चंद्रपूर जिल्हातील चिमूर तालुक्यात अवैध धंद्द्याना अक्षरशः उधाण आले आहे.चिमूर तालुक्यात सर्व प्रकारच्या अवैध धंद्द्याचा जिकडे तिकडे बोलबाला असताना,आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे मात्र शांत व चूप का बसलेले आहेत. असा प्रश्न मात्र आता चिमूर तालुक्यातील जनता विचारत आहे. काही दिवसापासून चिमूरातील अवैद्य धंद्याच्या बाबतीतील सोशल मीडियावर चांगलेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रेती तस्करांकडून सर्रास देवाण -घेवान घेण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परंतु यावर आमदार कारवाईची मागणी करताना दिसून येत नाहीत.

यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर आणि भुमिकांवर चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मनात रोष आहे.त्यांच्या विरोधात जनभावना नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवरती असल्याने ते खरंच चिमूर क्षेत्रातील होत असलेल्या अवैध्य धंद्यावर लक्ष देऊन कारवाई करतील का? हाही प्रश्न जनसामान्यात भेडसावतो आहे !
चिमूर तालुकातंर्गत वाळू तस्करीसह अवैध धंद्द्याकडे स्थानिक अधिकारी,वरिष्ठ अधिकारी,आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया हे सातत्यपूर्ण तथा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने,” महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमूर तालुक्यातील वाळू तस्करीसह अवैध धंद्द्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे,असेच आता जनता जनार्दन म्हणत आहे. पण आमदार भांगडिया हे मुख्यमंत्र्याचे अतिशय निकटवर्ती व विश्वासू असल्याने या गंभीर समीक्षेकडे लक्ष देतील असे वाटत नाही?

तरीपण राज्याचे सूत्रधार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमूर तालुक्यातील सर्व अवैध व्यवसायासह वाळू तस्करीवर लगाम लावले पाहिजे,सदर धंदे पुर्णतः बंद केले पाहिजे आणि संघटित गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे, असे सामान्य जनतेला वाटू लागले आहे. मात्र,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे किती तत्परतेने चिमूर तालुक्यातील वाळू तस्करीसह अवैध धंद्द्याकडे लक्ष देतात,याकडे चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे विशेष लक्ष वेधलेले आहे.

तालुक्यात देशी दारूला हद्दपार करू असे मालेवाडा येथे झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यक्रमानिमित्त संबोधित करताना आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी चिमूर तालुक्यातील अवैध दारु विक्रीवर लगाम लावणार असे आवर्जून सांगितले होते.

मात्र,चिमूर तालुकात देशीच्या अवैध दारु विक्रीवर लगाम लावण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन व नियोजन केले नाही,तशा पोलिसांना सुचनाही दिल्या नसल्याचे वाटते आहे?
उलट चिमूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात देशी दारू विक्रीचे अवैध धंदे फोफावले आहेत,जोमात सुरू आहेत.तालुक्यात आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या जवळचेच कार्यकर्ता हे अवैधपणे देशी दारुचा पुरवठा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात करीत असल्याचे वास्तविक चित्र समोर येत असून. छोट्या-मोठ्या कारवाया पोलीस वाल्याने केल्यास  लगेच साहेबांचा फोन खणखणतो. असे पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याकडूनच  दबक्या आवाजात बोलले जाते.
शहरात वेश्याव्यवसायाने डोके वाढ वर काढले.

  उलट स्थानिक प्रगती नगर येथील नागरिकांच्या माहितीवरुन चिमूर पोलीसांनी रात्रो ९ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलेल्या त्या दोन मुली अल्पवयीन असल्याची चर्चा शहरात रंगली होती.

अवैध वेश्याव्यवसायांच्या मुळात जाण्यापेक्षा त्या प्रकरणाला चिमूर पोलीसांनी व लोकप्रतिनिधीने     दाबून टाकले  असल्याची चर्चा आहे. वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबतचे निवेदन भाजपच्याच महिला  पदाधिकाऱ्यांनी  पोलीस निरीक्षकांना देण्यात आले होते.

शहरात सट्टा व्यवसाय झपाट्याने सुरू आहे.
 या वेवसायात सुध्दा राजकीय पक्षाचे पदाधिकारी उतरले असल्याने त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही,असे तालुक्यातील विचित्र दृश्य आहे.

चिमूर शहरा सुगंधीत तंबाखू  व्यवसाय झपाट्याने  पोलीस प्रशासनाच्या समोरच  अगदी हाकेच्या अंतरावर सुरू असताना अन्य व औषध  विभागाकडून काही कारवाई होताना दिसत नाही.
आणि काही लोक गुप्त मार्गाने गांजा विकत असल्याची लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.  असे असताना चिमूर पोलीसांना तो सुगंधीत तंबाखू विक्रीचा मोठा गोडावून दिसत नाही किंवा संबंधित तंबाखू विक्री करणारा व्यक्ती सुध्दा सापडत नाही,याला काय म्हणावे?सुगंधी तंबाखू विक्रीचा व्यवसाय करणारा व्यक्ती सुध्दा लोकप्रतिनिधींच्या जवळचा असल्याची चर्चा सुध्दा चिमूर शहरात नागरिकात आहे.

       चिमूर तालुक्यातील विविध नदीपात्रातून वाळूची तस्करी आजही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.मागील अनेक वर्षांपासून चिमूर तालुक्यात वाळूची व मुरुमाची तस्करी बिनधास्तपणे राज रोस पणे सर्रास  सुरू  असते. दररोज होणाऱ्या अमाप वाळू व मूरुमाच्या तस्करींने तर गुन्हेगारीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.वाळू तस्करी अंतर्गत,वाळू तस्करांकडून चिमूर तालुक्यातील महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे मोठ्याप्रमाणात रुपयांची खंडणी घेतात हे ऑडिओ क्लिप रेकार्डिंग संभाषणातून व वाॅटसप काॅल रेकार्डिंग संभाषणातून पुढे आले आहे.  वाळू व मूरुम तस्करीत आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी,कार्यकर्ते आणि,त्यांच्या जवळचे कंत्राटदार उतरले असून,त्या वाळू व मूरुम तस्कर पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी,आणि कंत्राटदारांनी  शासनाचा करोडो रुपयाचा महसूल  रेतीमापियाकडून आत्तापर्यंत बुडवला आहे. यावर मात्र लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाहीत.
    चिमूर तालुक्यातील व इतर ठिकाणच्या वाळू तस्करांसह संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःला मोठं समजून कायद्याला सध्यातरी गुंडाळून ठेवले आहे.ते खंडीणी देणारे व खंडणी घेणारे हप्तेखोर बनले आहेत असे ते व्हायरल झालेल्या व्हिडिओ संभाषातून समोर येत आहे तालुक्यात अवैद्य रेती तस्करीत सह संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढले असताना त्यांना पाठभर देणारे  अधिकारी, कर्मचारी,  राजकीय पाठबळ मिळत असल्याने सर्रास अवैध धंद्यांना उधाण आले आहेत.,

 आता जनतेला असे वाटू लागले की,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे,”त्यांच्या विधानसभा मतदार संघातंर्गत अवैध धंद्द्याकडे व वाळू-मुरुम तस्करीकडे,सातत्याने होणारे दुर्लक्ष हे जाणिवपूर्वक आहे काय? अशी शंका चिमूर विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या मनात घर करु लागली आहे.
 वाळू तस्करांसह मूरुम तस्करांवर आणि खंडणी देवाण-घेवाण करणाऱ्या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया का म्हणून करीत नाही? हा प्रश्न गंभीरच! 
आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे,”झाकली मूठ सव्वा लाखाची, की आपलेच दात आणि आपलेच ओट!अशी परिस्थिती असल्याने कारवाई कराची कुणावर? एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे मताचा डोलारा, अशी द्विधा  स्थिती निर्माण झाल्याने  सर्रास राजरोसपणे आंधळेपणाची पट्टी बांधून कर्तव्य पार पाडत असतील तर ते लोकांच्या मनात राहणार नाहीत,”याचे भान त्यांना असणे आवश्य आहे. कारण चिमूर तालुक्यात ,”लोकां मध्ये होत असलेली  चर्चा,बरेच सांगून जाते!….