चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची 125 वी जयंती भारत सरकारच्या डाक विभाग तर्फे होणार विशेष सन्मान
चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची 125 वी जयंती

भारत सरकारच्या डाक विभाग तर्फे होणार विशेष सन्मान

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 मध्ये मध्य-वहाड प्रांताच्या प्रांतिक न्यायमंडळात चांदा-ब्रहापुर स मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रपूरचे पहिले आमंदार व बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या डाक विभाग तर्फे विशेष आवरण (Special Cover) चे अनावरण करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे जयंती महोत्सव समिती, चंद्रपूर व बॅरिस्टर राजाभाऊ

खोबरागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर च्या विद्यमाने चंद्रपूरचे पहिले आमदार, बल्लारपूर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष, चंद्रपूर येथील धम्मदिक्षा समारंभाचे अध्यक्ष, विदर्भातील प्रसिद्ध व्यवसायिक, समाजसेवक श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची १२५ वी जयंती चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात २ जानेवारी २०२४ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवन, चंद्रपूर येथे श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणायात येणार आहे. सायंकाळी ४:०० वाजता डाक विभाग भारत सरकारच्या वतीने विशेष आवरण (Special Cover) चा अनावरण सोहळा विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, विमोचनकर्ता शोभा मधाले, पोस्ट मास्टर जनरल, विदर्भ क्षेत्र, नागपूर तसेच श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची सून सुधा हेमचंद्र खोबरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण हेमचंद्र खोबरागडे राहणार आहेत. अशी माहिती आज आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेतून प्रवीण खोब्रागडे, मारोतराव खोब्रागडे, दीपक जयस्वाल, नंदू नागरकर, डी. के. आरीकर , बलराम डोडाणी, शाहीन शेख, प्रवीण पडवेकर यांनी दिली.