काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिवसाला 10 लाख कार्यकर्ते येणार :- विजय वडेट्टीवार




काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिवसाला 10 लाख कार्यकर्ते येणार :- विजय वडेट्टीवार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
28 डिसेंबर रोजी काँग्रेस चा 138 वा स्थापना दिवस आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या स्थापना दिनाचे औचित्य साधून नागपूर येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी भव्य महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनासाठी देशभरातून दहा लाख कार्यकर्ते आणि यात चंद्रपूर जिल्ह्यातून 20000 कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर, शहराध्यक्ष रामू तिवारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील पाचशे प्रमुख नेते, आणि जवळपास दहा लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. जवळपास 50 एकर जागेवर संमेलन होईल. ही जागा निश्चित झाल्यावर काँग्रेस पक्षाने लोक निधी अंतर्गत 'डोनेट फॉर देश' हा उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. या अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 'तिलक स्वराज्य फंड' च्या प्रेरणेतून 1920- 1921 मध्ये हे अभियान राबविले होत आहे. यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी किमान 138 रुपये, तेराशे 80 रुपये, तेरा हजार आठशे रुपये, किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे योगदान या अभियानात द्यावेत असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी असणाऱ्या नागपूर आतील दीक्षाभूमीला वंदन करून येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीला जाणार असल्याने भारताच्या मध्यभागी असलेल्या
नागपूर शहराची मध्यभागी असल्याने महासंमेलनासाठी निवड करण्यात दिली असावी अशी ही माहिती दिली.

राज्यातील तीन चाकी सरकार असविधानिक

राज्यातील तीन पक्षाचे सरकार असून हे असंविधानिक आहे. सरकार स्वतः वाचवण्यासाठी प्रयत्नशील असून कुठल्याही सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अजूनही भरपाई मिळाले नाही. हिवाळी अधिवेशनात या सरकारने पाने पुसण्याचे काम केले. राज्यात महिलांवर अत्याचार गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ही वडट्टीवर यांनी केला. नुकत्याच झालेल्या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात यश मिळाले. यावर निकालावर जाऊ नका आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात नक्कीच परिवर्तन होईल. असा विश्वास व्यक्त केला. ईव्हीएम मुळे तीन राज्यात भाजपने चमत्कार केला. तिने राज्य हातातून गेले असते तर नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार नसते अशी बोचक ठिका वडेट्टीवार यांनी केली.