14 डिसेंबरला आदिवासी गोंड गोवारी जमातीचा नागपूर विधानसभेवर भव्य मोर्चा
14 डिसेंबरला आदिवासी गोंड गोवारी जमातीचा नागपूर विधानसभेवर भव्य मोर्चा


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती द्वारा विविध मागण्या घेऊन येत्या गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी आदिवासी गोंड गोवारी जमातीचा नागपूर विधानसभेवर लाखोच्या संख्येने मोर्चा निघणार आहे. या मोर्चात आदिवासी गोंड गोवारी जमातीने उपस्थित राहण्याचे आवाहन आज झालेल्या श्रमिक पत्रकार परिषदेतून गजानन कोहळे, 
 केशव सोनवणे, पी. व्ही .नागोसे , एस जी नेवारे, एस.टी. सहारे, विलास राऊत, रवी सोनवणे यांनी केले आहे.
गेल्या 70 वर्षात नंतरही त्यांचे घटनात्मक अस्तित्वाचे हक्काकडे शासनाने जाणीवपूर्व दुर्लक्ष केल्याने अजूनही जमात आपल्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिले आहेत. 1994 रोजी गोवारी जमात बांधवांनी आपल्या संविधानिक हक्काच्या मागणी करिता अधिवेशन काळात नागपूर विधानसभेवर भव्य लोकशाही मार्गाने मोर्चा आयोजित केला होता. तत्कालीन शासनाने अडेल तट्टू धोरणामुळे पोलिसांनी गरीब जमात बंधूंवर भगिनीवर अमानुष लाठी चार व गोळीबार केल्याने काही गंभीर होऊन तर 114 जमात बांधवांना नहाक आपला बलिदान द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील दिलेल्या निर्णयात आपला गोवारी जमात समूहाचे अस्तित्व
गोंड गोवारी अनुसूचित जमाती मधून सिद्ध झाले. असून त्याप्रमाणे जमात बांधवांनी, संघटनांनी आपल्या संविधानिक दस्ताऐवजी पुराव्यासह आपल्या संविधानिक हक्काच्या मागणी करिता वेळोवेळी शासनाला निवेदन अर्ज विनंती करूनही शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता पटवर्धन मैदान यशवंत स्टेडियम समोर धंतोली नागपूर येथून विधानभवनावर लाखोच्या संख्येने भव्य मोर्चा धडकणार आहे. तरी जमात बांधवांनी भगिनींनी, युवा -युवतिनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीने आज पत्रकार परिषदेतून करण्यात आली.