भिवापूर वार्डात कैलास दुर्गे यांच्या घरी मोठी घरफोडी
भिवापूर वार्डात कैलास दुर्गे यांच्या घरी मोठी घरफोडी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर भिवापूर वार्ड येते काल रात्री दोन अडीच च्या दरम्यान कैलास दुर्गे यांच्या वडिलांच्या घरी फार मोठी चोरी झालेली आहे. या चोरीत अज्ञात चोरट्यांनी दाराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून कपाटात असलेले दागिने अंदाजे 15 ते 20 तोडे आणि 75 हजार कॅश चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.
सदर प्रकरणाची बाब सकाळी कैलास दुर्गे यांची पत्नी मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघाली असता घराचे लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसले. संबंधित घरी चोरी झाल्याची माहिती बागला चौकीत पोलिसांना देण्यात आली. तुरंत शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपुत्र यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.
भिवापूर वार्डात या अगोदरही अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या डकेतत्या होत आहेत होत आहेत. वार्डा चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकात सध्या भीतीचे वातावरण आहे. चोरटे दिवसभर पाळत ठेवून ज्या घराचे कुलूप लावून दिसते त्या घरावर चोरी करून हात साफ करत असतात. असा कयास नागरिकात होत आहे. आता या प्रकरणाचा तळा पोलीस कशाप्रकारे लावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.