आमदाराच्या कार्यालयात, चहा पेक्षा कॅटली गरम' !
आमदाराच्या कार्यालयात, चहा पेक्षा कॅटली गरम' !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेलेत. प्रत्येकांचा एक वेगळा ठसा निर्माण होतो. त्यात त्यांच्या कार्याची पावती मिळते. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक म्हणून काम करतो. परंतु त्यांच्या कार्यालयात काम करणारे हेल्पर लोक ' दिड हरकंडात पिवळे होतात' तेव्हा? त्यांचा थाट हा नेत्यां पेक्षा कमी नसतो एखादी जबाबदारी मिळणे म्हणजेच स्वतःला आमदारासारखा समजूनच घेतात. उदाहरणात सांगायचे झाल्यास 'चहा पेक्षा कॅटली गरम' व्हायला लागते तेव्हा त्या लोकप्रतिनिधीची उतरता कळा लागली ? असे समजले जाते.
असे जिल्ह्यातील बरेच लोकप्रतिनिधीला याचा प्रत्यय आलेला आहे. आता सध्या शहरातील आमदार यांच्या कार्यालयातील चहाच्या कॅटल्या गरम होताना दिसत आहे. संबंधित आमदारांनी यांच्यावर नकळत दुर्लक्ष केल्यास भविष्यात आमदाराला याची मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा ही आता शहरात होऊ लागली आहे.
एवढेच नाही तर या कॅटल्यानी सार्वजनिक बांधकाम विभागात टेंडर,  कमिशन खोरी, आमदाराच्या नावाने गुंडागर्दी बळजबरी करून टेंडर मिळवून घेतात.  आमदाराच्या गैरहाजरीत नागरिकाचे काम करण्यास उत्सुक नसतात. कामासाठी येणाऱ्या नागरिकास  दबाव टाकून बोलतात.  स्वतःच्या गाड्या  भाड्याने देऊन सर्वीकडून आपली दुकाने थाटून बसले आहेत.
  स्वतःच्या पत्नी आणि भावाच्या नावाने शिव भोजनाचा प्रस्ताव आमदाराच्या कृपेने पाठवला जाते. सी टी पी एस मध्ये स्वतः  ठेकेदारी पद्धतीने काम   केले जाते. अशा या कॅटलीवर एका प्रकरणात केस सुरू आहे. लोकप्रतिनिधीने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून न राहता यांच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघावे!
 जिल्ह्यात स्वतंत्र  लोकप्रतिनिधी म्हणून देशात सर्वात जास्त मताने निवडून आल्याचे  भाष्य करणाऱ्या आमदारांना मात्र आता जळ  जाईल. भारतात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून  आले असले तरी 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूरकरांना जे आश्वासन दिले ते पूर्णत्वास न गेल्यास जनता मात्र येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत नक्कीच या प्रश्नाला विचारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपणच आपले कान टोचून घ्यावे  अन्यथा ह्या चहा पेक्षा कॅटल्या गरम  झाल्यास लय भारी जाईल!