आरटीओत खाजगी काम करणाऱ्या अतुल ची संपत्ती कोटीच्या घरात !आरटीओत खाजगी काम करणाऱ्या अतुल ची संपत्ती कोटीच्या घरात !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
प्रादेशिक परिवहन कार्यालयात खाजगी काम करणाऱ्या दलालांची संख्या काही कमी नाही. आरटीओ चा वरंडा ओलांडाच या खाजगी काम करणाऱ्या दलालांची आपल्याकडे विचारपूस सुरुवात होते. काय काम आहे?
असाच या कार्यालयात मागील 25 वर्षापासून एजंट म्हणून काम करीत असलेल्या अतुल दलाल याच्याकडे आत्ताच्या घडीला कोट्यावधीची माया असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
एवढेच नाही तर त्यांनी स्वतःचे बिलियंट अकॅडमी कॉन्व्हेंट उभारले आहे. दहा कोटी लागत लागलेला राजवाडा हॉटेल याचेच आहे. एवढेच नाही तर अकोला येथील ओम भवन सभागृह याचेच आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात मुख्य रस्त्यावर शेतीचा मालक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा पर्यटन क्षेत्र असलेल्या मोहरली येथे याची जागा उपलब्ध आहे. यात काही वरिष्ठ अधिकारी सोबतीला असून दोन प्लाँट, घर 20000 स्क्वेअर फुट मध्ये मोठ्या थाटात जागेचा सौदा झाल्याची सध्या कुजबूज आहे.
आरटीओ कार्यालयाच्या परिसरात मागील 25 वर्षापासून लर्निंग, परमनंट, साधे फार्म भरण्याचे काम करणारा हा अतुल दलाल आजच्या घडीला कोटीच्या संपत्तीचा मालक आहे?
कुठलाही नवीन अधिकारी ,कर्मचारी आरटीओ कार्यालयात आल्यास सर्वप्रथम अतुलचे दर्शन घेतल्याशिवाय पुढील कामाला सुरुवात होत नाही.
याच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी केल्यास
कुठल्या माध्यमातून एवढी मोहमाया जमवली हे सांगण्याची आता सामान्य माणसाला गरज नाही.
याच्या कार्यालयात रोजची दहा ते पंधरा हजाराची आवक असून, महिन्याकाठीला लाखोची वसुली जमा होतो. संबंधित आरटीओ च्या   वाहनधारकाचा महिनेवारी हप्ता याच दलाला कडे  एक तारखेच्या आत जमा होत असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती आहे.
 यात वरिष्ठ अधिकाऱ्यापासून सर्व आरटीओ कार्यालयातला व्यवहार  अतुलच्या कमऱ्यातून होतो.
  या कारणामुळे अतुल चांगला चर्चेत असून सध्याच्या   आरटीओ कार्यालयातला कर्मचाऱ्यावर वचक टाकणारा   अधिकारी समजल्या जातो!