अकरा कोटी विकास कामाच्या भूमिपूजनासाठी कंत्राटदाराला पाच लाखांचा चुना! कार्यकर्ते उपासी, पी ए तुपाशी' !अकरा कोटी विकास कामाच्या भूमिपूजनासाठी कंत्राटदाराला पाच लाखांचा चुना!

' कार्यकर्ते उपासी, पी ए तुपाशी' !

चमच्यांनी कंत्राटदाराला 5 लाखाचा लावला चुना...

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आचारसंहिता लागण्या अगोदर 2024 च्या निवडणुकीपूर्वी विकास कामाच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला आहे.
लोकप्रतिनिधींना आपण जनतेला दिलेल्या वचननामाचा जोगवा मागायचा आहे. त्यासाठी भर भक्कम निधी आणून विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी विविध ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन दोन दिवसाअगोदर ग्रामीण भागात अकरा कोटी 13 लाख कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनासाठी कंत्राटदाराकडून चक्क लोकप्रतिनिधीच्या पीएने पाच लाख 57 हजार रुपये गोळा केल्याची चर्चा आहे. विविध वर्तमानपत्रातील जाहिराती खर्च आणि उद्घाटन समारंभासाठी लागणारा खर्च म्हणून कंत्राटदाराला काम मिळावं म्हणून त्याने हे पीएला दक्षिणा दिल्याची चर्चा होत आहे. मात्र यामुळे खरा कार्यकर्ता उपाशी असून पि.ए मात्र तुपाशी आहेत.
सध्या लोकप्रतिनिधी 2024 च्या निवडणुकी अगोदर भूमिपूजनाच्या कामात गुंतले आहेत. याचाच फायदा घेऊन लोकप्रतिनिधीच्या चमच्यांनी आपली दुकानदारी कशी चालवता येईल या कामात लागले आहेत.
अशी ही चर्चा होत आहे की, लोकप्रतिनिधीचे पीए दोन दोन महिन्यांनी अमरावती ,वणी येथे भोंदू बाबाच्या मठावर जाऊन आपल्या कलाईला धागेदोरे बांधून घेत असल्याची चर्चा आहे. त्यात लोकप्रतिनिधी मूकबधिर का,
की भोंदूबाबाचा असर अशी चर्चा आता होऊ लागली आहे.