वर्धा नदीच्या पात्रातून दिन दहाडे रेतीची तस्करी
महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पिपरी धानोरा येथील तलाठी साजा क्रमांक आठ हद्दी असलेल्या वर्धा नदीच्या पात्रातून रोज रात्रोला रेती तस्करांचा खेळ खंडोबा सुरू असतो. तर या तस्करांनी दिन दहाडे रेती तस्करी त्याही महसूल कर्मचारी अधिकारी यांना न जुमानता भर दिवसा हाफ टन मध्ये अवैद्य रेती भरून सर्रास रेतीची तस्करी होत आहे. दररोज हजारो ब्रास रेती जेसीबी द्वारे नदीपात्रातून काढून ट्रॅक्टर, हाफ टन सारख्या वाहनाने उचल होत आहे.
संबंधित रेती तस्कराला राजकीय वरदस्त असल्यामुळे सुरुवातीला एक ट्रॅक्टर पासून आता तो हाफ टनवर येऊन पोहोचला आहे.
हा साजातील पटवारी यांना गावातील नागरिकांना अनेकदा या संदर्भात ची माहिती दिली परंतु या अधिकाऱ्यांनी धूर्त राष्ट्राची भूमिका घेतल्याने काही फरक पडत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
या या नदीपात्रातील रेती उपसा मुळे पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे जनावरास, मानवासही मोठी जीवित हानी होण्याचे नाकारता येत नाही. संबंधित वाहनामुळे गावातील नागरिकांची झोप उडाली आहे. आता तर या तस्करांची दादागिरी पर्यंत मजल गेल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात होऊ लागली आहे. महसूल विभागांनी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेती तस्करांच्या मुस्क्या आवळावी अशी मागणी होत आहे.