... तस्करीतून झालेल्या शिवाच्या खुणाने शहर हादरले


Crime 


... तस्करीतून झालेल्या शिवाच्या खुणाने शहर हादरले!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शहरातील सरकार नगर परिसरात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झालेल्या घटनेने चंद्रपूर शहर चांगलेच हादरले. जिल्हा दहशतवादाच्या घटनेने चांगलाच उत्माज माजला असून दिवसांन दिवसा अवैद्य व्यवसायातून, रेती तस्करात, कोळसा तस्करीत,अवैद्य धंद्यातून जिल्ह्यात खून प्रकरण वाढीस आले आहेत. तिकडे पोलीस प्रशासन अपघातात घट झाल्याचे सांगत असले तरी जिल्हात दहशतवादाच्या घटनांना खत पाणी घातल्या जात असल्याचे विदारक चित्र चंद्रपूर जिल्हा दिसून येत आहे.
शिवसेना (उबाठा) युवा सेनेचा शहराध्यक्ष शिवा मिलींद वझरकर यांची धारदार चाकुने हत्या करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या हत्येमध्ये शिवसेना (उबाठा) चे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्निल काशिकर, हिमांशू कुमरे, रोहीत पितरकर, सुमित दाते चैतन्य आसकर, रिवान पठाण, नाजीर खान, अन्सार खान यांच्या गॅंगवार मधून शिवाचा नाहक बडी गेला. युवासेना शहराध्यक्ष 25 वर्षीय शिवाच्या हत्येमुळे शहरात खळबळ माजली असुन अपराधी प्रवत्तीच्या गन्हेगारांचा राजकीय पाठबळ कुणाचे मिळत आहे अशी चर्चा होऊ लागले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
सर्व आरोपींनी शिवा व त्याच्या मित्राला घेऊन स्वप्निल काशिकर ने हिमांशु कुमरेला आपल्या कार्यालयात घेवून गेला तेथून हिमांशु ने एक लोखंडी चाकु घेवून आला व हिमांशु ने लोखंडी चाकुने शिवा वर वार केले. त्यात शिवा खाली पडला. त्यानंतर उपस्थित सर्व आरोपींनी शिवाला लाथा- बुक्यांनी मारहाण केली. शिवा च्या मित्रांनी नंतर शिवाला यशोधन या खाजगी दवाखान्यात नेले असता त्याला त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले.
रामनगर पोलिसांनी स्वप्निल काशिकर, हिमांशू कुमरे, चैतन्य आसकर, रिवान पठाण, नाजीर खान, रोहीत पितरकर, सुमित दाते, अन्सार खान यांचेवर भादंवी 302,
149, 143, 147 व मपोअ अंतर्गत 135 कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
घटना घडली तारीख व वेळ : दिनांक 25.01.2024 चे 20.20 वा. ते 20.30 वा दरम्यान घटनास्थळ स्वप्नील काशीकर यांचे ट्रान्सपोर्टचे ऑफीस समोर, गुरुव्दारा मागे चंद्रपूर (02 कि.मी. उत्तर).
मृतक शिवा मिलिंद वझरकर, वय 23 वर्षे, जात सोनार, (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट युवा सेना चंद्रपूर शहर प्रमुख) व्यवसाय- ठेकेदारी, रा. अरविंद नगर चंद्रपूर
आरोपीचे नाव व अटक 1) हिमांशु कुमरे, वय 25 वर्षे, 2) स्वप्नील काशीकर, वय 38 वर्षे, 3) चैतन्य आसकर, वय 20 वर्षे 4) रिझवान पठाण, वय 25 वर्षे, 5) नाझीर खान, वय 21 वर्षे, 6) रोहीत पितरकर, वय 24 वर्षे, 7) सुमित दाते, वय 27 वर्षे, 8) अन्सार खान, वय 25 वर्षे सर्व राह. चंद्रपूर व ईतर आरोपी अटक आरोपींना ताब्यात घेतले असून अटकेची कार्यवाही सुरु आहे.

खुणाच्या घटनेच्या थोडक्यात हकिकती नुसार, यातील फिर्यादी हे त्याचे मित्रासह बोलचाल करीत असताना आरोपी क्र.1 हिमांशु कुमरे, वय 25 वर्षे, याने यातील मृतकास फोन करुन वडीलांना बरेवाईट बोलून बोलावल्याने आरोपीने बोलावल्या ठिकाणी गेले असता मृतक शिवा मिलिंद वझरकर, वय 23 वर्षे यास जुन्या पैशाच्या वादावरुन व मृतकाचे वडीलांना बरेवाईट बोलल्याचे कारणावरुन आरोपींनी तसेच हिमांशु कुमरे याने लोखंडी चाकूने शिवा वझरकरचे पोटावर चाकूनू वार करुन आणि त्याचे सह असलेले ईसमांनी खाली पडल्यावर लाथांनी मारुन जिवानिशी ठार मारले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन व वैद्यकीय अहवालावरुन पो.स्टे. रामनगर येथे अप क्र. 84 /2024 कलम 302,143,147,148,149 भादवी सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

वाळू तस्कर स्वप्नील काशीकर शिवसेना (उबाठा), वाहतूक सेना चंद्रपूर विभाग जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांनी आपल्या सहकारी यांना घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा वाळू घाटावरचे अवैध वाळू उत्खनन बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे यांच्यावर जीवघेना हल्ला केला असून त्यात उमरे हे गंभीर जखमी झाले होते. सदर वाळू तस्करी प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी कलम 307 व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले असून साहिल सय्यद, वैभव पेंडसे यांना अटक केली होती मात्र दरम्यान स्वप्नील काशीकर व इतर पाच ते सहा आरोपिंनां 2 दिवसांपूर्वीच अंतरीम जामीन मंजूर झाला होता.
जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षात गुंडागिरी करणाऱ्यांची व अवैध धंदे करणाऱ्यांची मोठी फौज असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर ज्यांच्यावर उपविभागीय वन अधिकारी यांची बंदूक हिसाकावून त्यांच्यावरच वार करण्याचा प्रयत्न व त्यांना धमकावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी स्वप्नीलवर गुन्हे दाखल होते व या प्रकरणानंतरच काशीकर ची भाजप मधून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली होती.
या सेना शहर प्रमुखाची हत्या करणाऱ्या स्वप्नील काशीकर ला कुणाचे अभय मिळत आहे याची चर्चा असून अश्या गुन्हेगारी वृत्तीच्या पदाधिकाऱ्याची अजूनही पदावरून अधिकृत हकालपट्टी न केल्याने उबाठा जिल्हा प्रमुख यांची भूमिका संशयस्पद असून यात वाळू तस्करीचे आर्थिक राजकारण दडले असल्याचेशिवसैनिकांच्या चर्चेतून कळते.