शिवा हत्याकांडातील आरोपींना तीन दिवसाच्या पीसीआर , एलसीबी खुनाचे धागेदोरे उघडणार?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात 25 जानेवारीला सायंकाळी साडेआठ वाजता बंगाली काम परिसरातील सरकार नगरात शिवा वझलकर
याचा खून करण्यात आला. या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. त्या हत्याकांडातील आठही आरोपींना रामनगर पोलिसांकडूनअटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता रामनगर पोलिसांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने न होता रामनगर पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या हत्या प्रकरणाचा तपास एलसीबी कडे सोपविला. स्थानिक गुन्हे अन्वेष शाखे कडून पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेतल्याने न्यायालयाने ती मागणी मान्य केली सदर आरोपींचा पीसीआर तीन दिवसासाठी मिळाला असून
एलसीबीला हत्या प्रकरणातील धागेदोरे काय हाती लागतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
आरोपींना न्यायालयात हजर करण्याकरिता आणले असता. शिवाच्या समर्थकांनी आरोपीच्या कानशिलात लावल्याने न्यायालयात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
25 जानेवारीला झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर युवा सेना अध्यक्ष शिवा मिलिंद वझरकर यांची ठाकरे गटाचा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल चंद्रकांत काशीकर, हिमांशू कुमरे, चैतन्य ऑस्कर, रिजवान पठाण, खान, रोहित पित्तरकर, सुमित दाते, आणि अन्सार खान यांनी मिळून निर्गुन पणे हत्या केली. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्याच वाळू माफियाकडून हत्या झाल्याने वातावरण चंद्रपुरात ढवळून निघाले आहे.
या हत्तेमुळे अनेक प्रश्न निर्माण केले असून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे.
शहरात काल जटपुरा गेट येथे शिवाच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी म्हणून चंद्रपुरात कॅण्डल मार्च निघाला. स्थानिक जटपुरा गेट येथे शेकडो युवा कार्यकर्ते शिवा वझरकर यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनी शेकडोच्या संख्येने कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले .
या प्रकरणामुळे शहरात शांतता आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न एरणीवर आला आहे. वाळू तस्करीतून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगमने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीला होत आहे. जिल्ह्यात अनेक प्रकारचे अवैद्य धंद्यातून तस्कर निर्माण झाले आहेत. या गुंड प्रवृत्तीच्या खुनातील आरोपींकडे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे या हत्याकांडातील सर्व आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कॅन्डल मार्च दरम्यान करण्यात आली.