वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव साहेब यांच्या हस्ते दिनचर्या दिनदर्शिकाचे प्रकाशन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
साप्ताहिक दिनचर्या या वृत्तपत्राच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन दरवर्षीप्रमाणे चंद्रपूर वाहतूक शाखेतून करण्यात येते. यावर्षी सुद्धा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रोशन यादव साहेब, तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघमोडे यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी दिनचर्या चे संपादक दिनेश एकवणकर, यांनी म्हणाले मागील सहा सात वर्षांपासून दरवर्षी वाहतूक शाखेतून दिनचर्या दिनदर्शिका प्रकाशित करून सर्वप्रथम वाहतूक शाखेतील पोलीस यांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिनदर्शिका देण्यात येते. हा नित्य उपक्रम मागील सात वर्षापासून सतत सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष श्याम राजूरकर, पत्रकार नरेश निकुरे, पत्रकार विकास मोरेवार, पत्रकार विठ्ठल आवळे, यांची उपस्थिती होती. वाहतूक शाखेतील सर्व पोलिसांना दिनचर्या दिनदर्शिका नवीन वर्षाची भेट म्हणून देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक पोलीस संदीप जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.त्यावेळी वाहतूक शाखेतील सर्वच कर्मचारी उपस्थित होते.