खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी आलेल्या महिलांचा हिरमोड !





खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या    प्रदर्शनी व विक्रीसाठी आलेल्या महिलांचा हिरमोड !

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान 


दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :- 
 चंद्रपूर  क्लब ग्राउंड येथे दिनांक 22/ 23/ 24 /2 2024  पासून तालुकास्तरीय नऊ तेजस्विनी प्रदर्शनी व विक्री चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या  उद्घाटन  करून सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय महिला बचत गटांच्या  प्रदर्शनी किंवा विक्री करिता स्टॉल लावण्यात आले. मात्र चंद्रपुरातील जनतेने   विक्रीसाठी लावलेल्या स्टाल कडे   नागरिकांनी पाठ फिरवली. मागील 3 दिवसापासून, अनेक महिला बचत गटांच्या  मालाची विक्रीची बोहनी सुद्धा झाली नाही. अनेक महिला बचत गट तालुका स्तरावरील असल्याने  आने जाने  करावे लागत आहे. त्याचा साधा खर्चही या माध्यमातून निघत नाही आहे. वरून  स्टावर वरील ग्राहक नाही. आणि तिकडे शेतीचेही काम गेले. या दोन्ही विवचना सापडलेल्या बचत गटाच्या महिलांचे फार नुस्कान झाले.
महिला सक्षमीकरणासाठी केंद्र राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिक लोकाभिमुख करून महिलांना संघटित करून, प्रशिक्षण देऊन, आर्थिक सक्षमीकरण करणे, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना एकत्रितपणे एकाच छत्राखाली राबविण्यात यावेत यासाठी या योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने  महिला बचत गटांतर्फे उत्पादीत वस्तूची प्रदर्शनी ही भावी महिला उद्योजगांसाठी मोठे मंच असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय चंद्रपूर द्वारा संचालित खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने पहिला बचत गटातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 मोठ्या थाटामाटात या कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. परंतु या कार्यक्रमाची जनजागृती पाहिजे तेवढी झाली नसल्याने बचत गटातील अनेक बचत गटांची  हिरमुड झाली . संबंधित प्रदर्शनीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे प्रदर्शनी सुख-सुकाट होता. एवढेच नाही तर आता या प्रत्येक स्टाल मागे बचत गटांना एक हजार रुपये फी सुद्धा आकारण्यात आली असल्याची आप बीती महिलांनी सांगितली. विक्रीच नाही तर आता एक हजार रुपये द्यायचे  कुठून हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. शासनाच्या विविध योजना हा ग्रामीण भागातील नागरी साठी उपलब्ध होत असताना एकीकडे त्यांची जनजागृती न करता  शासनाचा करोडो रुपयाचा निधी हा व्यर्थ जात असल्याचे या प्रदर्शनी व विक्री अभियानातून दिसून आले.