संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळेत सौ.शिल्पा ठक्कर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ प्रकाशजी ठक्कर यांजकडून उपस्थितांना मोफत मिष्ठान भोजन




संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळेत सौ.शिल्पा ठक्कर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ प्रकाशजी ठक्कर यांजकडून उपस्थितांना मोफत मिष्ठान भोजन
दिनचर्या न्युज :- 
मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-वाढदिवस म्हटले की,जल्लोष,डीस्को नाचगाणे,पार्टी अशा पध्दतीने धनिक लोक साजरा करत असतात.पण ठक्कर कुटुंबियांनी कुठलाही बडेजाव न करता सामाजिक बांधिलकी समजून सौ.शिल्पा ठक्कर यांचा वाढदिवस प्रकाशजी ठक्कर यांनी भायखळा येथील संत गाडगे बाबा महाराज धर्मशाळेत साधेपणाने साजरा केला.प्रकाशजी ठक्कर यांनी धर्मशाळेतील उपस्थितांना कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता मोफत मिष्ठान भोजन दिले.सौ.शिल्पा ठक्कर,प्रकाशजी ठक्कर व त्यांच्या कुटुंबियांनी स्वहस्ते भोजन वाटप केले.वाढदिवसाप्रित्यर्थ अन्नदान केल्याचा आनंद व केल्याचा आनंद व कृतज्ञता व समाधान सौ.शिल्पा ठक्कर यांच्या चेह-यावर दीसत होते.याप्रसंगी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर उपस्थित होते,त्यांनी प्रास्ताविक केले. व संत गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक यांनी आभार मानले.