चंद्रपूर लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या बैठकीत ' या' नावावर शिक्कामोर्तब !




चंद्रपूर लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या बैठकीत ' या' नावावर शिक्कामोर्तब !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या सर्व प्रक्षश्रेष्ठीची बैठकाच एननडी हॉटेल येथे पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीच्या समर्पित पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी नेते उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीनुसार आघाडीकडून कोण उमेदवार द्यायचा! ओबीसीतून, बहुजनातून अशा प्रकारची चर्चा झाल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली असली तरी, पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्ना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी उत्तर देताना आले की, पक्षात तसे वातावरण नसून सोशल मीडियावर काहीतरी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठलाही वाद काँग्रेस पक्षात नसून तसे मतभेद भारतीय जनता पक्षात सुद्धा आहे. काँग्रेस नेते ,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना सुद्धा या बैठकीला बोलवण्यात आले होते. परंतु ते राहुल गांधी यांच्या सभेमुळे या बैठकीला येऊ शकले नाही. असे सांगत असले तरी एकाच पक्षात होत असलेल्या उमेदवारीसाठी घुसमड सध्या चांगलीच जिल्ह्यात रंगत आहे. एकमेकांवर माध्यमाच्या द्वारे तारेशे ओढले जात आहे . हे सर्वश्री लपून राहिले नाही. परंतु आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याच नावाला पसंती दर्शवली की काय असा सूर आज झालेल्या आघाडीच्या बैठकीतून काही नेत्यांच्या चर्चेत येत होता.
परंतु जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी ती बाब पक्षश्रेष्ठीच्या दालनात ठेवल्याने , आणि आमचा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य म्हणून सांगून लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला असेल असे अघोषित सिद्ध केले. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. आम्ही पक्षाकडे आमदार सुभाष धोटे, आमदार विजय वडेट्टीवार,आमदार प्रतिभाताई धानोरकर, या तीन नावाचे पत्र पक्षश्रेष्ठीकडे नाव पाठवले गेले आहेत. आता पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्या उमेदवाराची इंडिया आघाडी समर्थन करेल असे ते बोलले.