धानोरकरांच्या प्रचारार्थ उद्या कन्हैया कुमार यांची चंद्रपूरात सभा chandrapur ncp.html
धानोरकरांच्या प्रचारार्थ उद्या कन्हैया कुमार यांची चंद्रपूरात सभा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर: चंद्रपूर-वणी -आर्णी लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ उद्या ( रविवार ) कन्हैया कुमार यांची सभा न्यू इंग्लिश हायस्कूल च्या ग्राउंडवर होत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष असलेले कन्हैया कुमार देशातील तरुणांसाठी आयकॉन ठरले आहेत. कन्हैया कुमार यांच्या सभेला मोठी गर्दी होईल असे काँग्रेस कडून सांगण्यात येत आहे.

चंद्रपुर लोकसभा मतदार संघात प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडलाचे चित्र आहे. स्टार प्रचारकांनी चंद्रपुरातील सभा गाजवली आहे. एकीकडे भाजपाकडून सेलिब्रेटीना प्रचारात उतरविले जात असताना काँग्रेसने मात्र सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रभावी चेहरे यांना प्रचारात उतरवीत आहे. दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक कुमार केतकर यांची यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हातील सभा झाली होती. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. उद्या ( रविवार ) कन्हैया कुमार यांची सभा चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल च्या ग्राउंडवर सभा होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी ते उद्या चंद्रपुरात येत आहेत. या सभेला तरुणांची मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.

धानोरकरांचा बैलबंडीतून प्रचार

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात प्रतिभा धानोरकरांनी शुक्रवारला दौरा केला होता. या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.आज यवतमाळ जिल्ह्यातील मार्डी, कुंभा, बोटोनी, मारेगाव, राजूर, चिखलगाव आणि घोन्सा या गावांना धानोरकर यांनी भेट दिली. थेट बैलबंडीतून धानोरकर यांनी प्रचार केला.