महाराष्ट्रात सर्वात मोठ्या मतांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव, पराभवाचे कारण काय?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढतीत निवडणुकीत मात्र गणित काही वेगळेच झाले. भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते तथा राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वरोरा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत झाली. मात्र महाराष्ट्रात संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या चंद्रपूर लोकसभेच्या निकालाने सर्वांच्या भुवया उंचावल्या, त्या अशा की, अपेक्षा नसतानाही आमदार प्रतिभा धानोरकर यांना 7,18,410 मते मिळाली, तर सुधीर मुनगंटीवार यांना 4,58004 मते मिळाली. प्रतिभाताई धानोरकर यांना 2, 60406अशा भरघोस मताने विजय मिळाला. महाराष्ट्रात कुठे नव्हे अशा पराभवाने चंद्रपुरातील लोकसभा क्षेत्रातील दिग्गज नेत्याचा पराभव चांगला अंगलड आला. भाऊंना लोकसभा निवडणुकीसाठी तीनदा हायड्रिक करावी लागली.
या पराभवाची विमांशा करताना कार्यकर्ता कडून काय कमी राहिले ,कुठे चुका झाल्या याचा परिमार्स शोधणे नित्यन्त गरजेचे आहे.
त्यात पहिले कारण, भाऊ ने अनेक सभा घेतल्या त्या सभेत भाऊच्या वाणी वरचा ताबा, अनेक ठिकाणी भाऊंच्या जीभ घसरल्याची कारणे, आणि स्वतः निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत नसताना पक्षाने माती मारलेले अवजड ओझे हे भाऊंना पेलवता आले नाही. त्यातच भाऊचा आत्मविश्वास कोलमडलेला दिसून येत होता. पूर्वी भाऊच्या संभाषणातून दरष्ट नेता असल्याची भावनिक आर्थ जनतेला आहार्थ करत असे, यावेळेस भाऊ कडून असे काही दिसून येत नव्हते, एवढेच नाही तर अति विश्वासात असलेल्या पदाधिकाऱ्याकडे अति आत्मविश्वासाने सोपविले कामे योग्य पद्धतीने पदाधिकाऱ्याने हाताळले गेले नसल्याची बाब समोर येत आहे. त्यातच सर्वात महत्वाचे म्हणजे, पदाधिकारात आलेला अहंपणा, त्यांची शासकीय, निमशासकीय कार्यालयात काम करून घेण्याची पद्धत ही अनेक अधिकाऱ्यांना भाऊच्या नावाने झोंबवून अलगट करून घेत होते. त्यामुळे अनेक व्यवस्थित काम न करताना भाऊच्या नावाचा दुरुपयोग, धाक -दपट होताना दिसून येत होता. त्यामुळे वैतागलेल्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची नाराजी उघड उघड दिसून येत होती.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लोकसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी ही जनतेला भावली नाही. मोदी ने दिलेले मागील दहा वर्षातील आश्वासने, याची पूर्तता न करता पुन्हा पाच वर्ष मोदी सरकार ला देण्याची घवघवीत मागणी ही जनतेला पटणीस आली नाही. त्यामुळे मोदीच्या गॅरंटीचा रोष सुधीर भाऊच्या माती आला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पराभवाचा धसका सहन करावा लागला. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातच नावलौकिक करणारे, विकास पुरुष म्हणून देश पातळीवर नाव कोरणा-या भाऊंना मात्र चांगलीच चारही खाने पटकनी खावी लागली.