चिचपल्ली जवळ रात्री दोन हायवात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू ?
रेती तस्कराकडून अपघातावर पडदा पाडल्याची चर्चा !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पावसाने आपली दळी मारल्याने नदी नाल्यातून राजरोसपणे रात्री रेती तस्कराकडून रेतीची तस्करी होत असते. रात्रभर अवैद्य रेतीची तस्करी करण्याचा खेळ खंडोबा करण्याच्या बेतात असणाऱ्या दोन हायवा चिचपल्ली जवळील ग्रामीण रुग्णालयाच्या अगदी आसपास दोन हायवात जबरदस्त समोरासमोर टक्कर झाल्याने एका हायवा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना चर्चिला जात आहे.
काल रात्री अंदाजे दोन वाजताच्या दरम्यान चिचपल्ली जवळ रेती भरलेला हायवा मूल कडून येत असताना चंद्रपूर कडून जाणाऱ्या खाली हायवावर समोरासमोर टक्कर झाली त्यात एका हायवा चालकाचा जागीच मृत्यू तर दुसरा हवा चालक जखमी झाल्याची चर्चा गावात होत आहे. घटना झाल्यावर या ठिकाणावरून रेती भरलेल्या
हाय वातील रेतीची विल्हेवाट लावल्याची चर्चा होत आहे. संबंधित घटनेच्या ठिकाणावरून दोन्ही गड्यांना कुठे हलवण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही?
परंतु सूत्राच्या माहितीनुसार रेती तस्करांकडून या प्रकरणावर पडदा पाडल्या गेल्याची सध्या चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी रामनगर पोलिस अंतर्गत येत असलेल्या चिचपल्ली पोलीस चौकीकडून पुढील तपास सुरू आहे.