जुनोना चौकात सुरू असलेल्या अवैध दारू दुकान बंद करून दोषीवर कारवाई करा - शिल्पा कांबळे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महिला फाउन्डेशन बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर
स्त्रीशक्ती महिला फाउंडेशन धर्मादाय संस्था, चंद्रपूर संस्थेचे अध्यक्षा शिल्पा सुहास कांबळे यांनी जुनोना चौक येथे सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रीवर बंदी आणून कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. अवैध्य दारू विक्रेता आशिष चांदेकर हा अवैद्य दारू जुनूना चौकात खुलेआम दारूची विक्री करत असल्याची या संदर्भात रामनगर पोलीस, आणि शहर पोलीस यांना यापूर्वीच वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर आज शिल्पा कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. या अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. खास करून युवा वर्ग नशेच्या आहारी जात आहे.
पोलीस विभागाला या अवैध्य दारू विक्रीची माहिती असून सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात येत नाही.
त्यामुळे स्त्री शक्ती महिला फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेमार्फत आठवड्याभरात योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असे आज पोलीस अधीक्षणाकांना दिलेल्या निवेदातून सांगितले आहे