इतर मागास बहुजन कल्याण विभागात कायमस्वरूपी पदे भरा - सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ



इतर मागास बहुजन कल्याण विभागात कायमस्वरूपी पदे भरा - सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

 दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
 राज्य सरकारणे बाह्य यंत्रणेव्दारे कामे करून घेण्यासाठी दिनांक 6 सप्टेंबर 2023 ला 9 कंपन्यांना मान्यता
देण्यात आली होती. त्यावेळी अनेक संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. राज्य
सरकारने ते परिपत्रक 31 ऑक्टोबर 2023 ला रद्द केले. याच परिपत्रकाचा इतर मागास बहुजन
कल्याण विभागाने आधार घेऊन बी. एस. 2 इम्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी,
प्रशासकीय सोयीसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2023 पासून 9 महिन्यासाठी प्रशासकीय अडचणी येऊ नये म्हणून 20 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.  महाराष्ट्र सरकारणे कायम स्वरूपी पदे भरणे गरजेचे होते, आज राज्य शासनाकडे एकूण एक लाख त्याच्यावर ओबीसी विजा भज विमाप्र अनुसूचित जाती जमाती यांचा बॅकलॉग असून तो न भरता इतर मागास बहुजन कल्याण विभागाने एकूण 870 पदाची   26 जुलै 2024 ला बाह्य संस्थे‌द्वारे पदे भरण्या करिता ई-निविदा काढण्यात आली आहे. व त्याची मुदत 16 ऑगस्ट 2024 पर्यंत होती. राज्य शासनाने बाह्य संस्थेद्वारे पदे भरल्यास ओबीसी, विजा., भज., विमाप्र., अनुसूचित जाती जमातीच्या व सामान्य प्रवर्गातील बेरोजगार मुला मुलींवर अन्याय होणार असून इतर मागास बहुजन  विभागातील व ओबीसी वसतीगृहातील वार्डन पदे कायमस्वरूपी भरून ओबीसी, विजा, भज, विमाप्र, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील बेरोजगार मुला-मुलींना न्याय मिळवून ‌द्यावा, 
तसे नाही झाल्यास आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन जिल्हाधिकारी  कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी मार्फत  राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, ओबीसी मंत्री चंद्रपूर चे पालकमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण प्रधान सचिव यांना पाठविण्यात आले.  निवेदन देते वेळी यावेळी
सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,सतीश भिवगडे ,सुधाकर काकडे ,कृष्णा मसराम आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष ,शुभम मडावी ,कुसुमताई उदार ,सूरज कोवे,अक्षय येरगुडे,आकाश लोडे,मनिषा बोबडे जिल्हा महासचिव महिला महासंघ  ,आसाराम राघोते,रविंद्र टोंगे जिल्हाध्यक्ष विध्यार्थी महासंघ ,राहुल चालूरकर ,प्रशांत पिंपळशेंडे ,अनिकेत पिंपळशेंडे  यांची उपस्थिती होती.
  बॉक्स- रवींद्र टोंगे यांचे 21 दिवस आंदोलन चालले तेव्हा सरकारने दिनांक 29 सप्टेंबर 2023 ला  मुंबई येथे झालेल्या बैठकीत ओबीसीचा बॅकलॉग भरण्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला लेखी आस्वासन दिले होते.                                          
 इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वसतिगृह काही ठिकाणी सुरू केले आहेत. नियुक्त्या कोणत्या केल्या  प्रश्न आहेत?
हा संदर्भात ओबीसी विभागाच्या अधिकारी  कावळे यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की,
ओबीसी वस्तीगृहातील कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. परंतु ती कशाच्या आधारावर करण्यात आली ती सांगण्यास नकार दिले. आश्रम शाळेतील काही सफाई कर्मचारी एक दोन लोकांना त्या ठिकाणी सामावून घेतले आहेत. परंतु कंत्राटी भरण्यात आलेल्या पदाचे ऑर्डर आणि ते कशाच्या आधारे भरण्यात आले हे सांगण्यास अधिकाऱ्याने  त्यावर न बोलणे टाळले.
 संबंधित वस्तीगृहात अनघटीत  एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही सचिन राजूरकर यांनी उपस्थित केला.