भाजपाचे अफलातून आंदोलन! बगल मे चुरा! गाव मे डंडोरा!




भाजपाचे अफलातून आंदोलन! बगल मे चुरा! गाव मे डिंडोरा!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून घुगुस ते पडोली आणि पडोली ते ताडाली या मुख्य रस्त्यावर फार मोठे मोठ खड्डे पडल्यामुळे अनेकांचे अपघात झाले. काही दिवसापूर्वी एका मुलीला अपघातात तिला पाय गमवावा लागला. अशा भयावत परिस्थितीत या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हे सत्य असले तरी भाजपालाच आपल्या घरी आपल्या सरकारच्या विरोधात अफलातून आंदोलन करण्याची वेळ येत आहे. यापेक्षा सत्तेत राहणे आणि विरोधात राहणे यात फरक काय? असा प्रश्ना सामान्य नागरिकांना वाटू लागला आहे.
भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना. शासनकर्त्यालाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येत आहे. यामुळे प्रशासनाच्या अधिकारावर आता शासन कर्त्याचे वचक राहिले नाहीत का? सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजवावे अन्यथा तीन दिवसात जन आंदोलन करण्याचे कार्यकर्त्याकडून पडोली पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. संबंधित रस्त्याचे बांधकाम सत्ताधाऱ्याकडूनच करण्यात आले असून  या बांधकामाचे ठेकेदार भाजप प्रणित असून ठेकेदार यांना कमिशन खोरीत कामाच्या दर्जाचे   तीन तेरा वाजवले आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहे. आता भारतीय जनता पार्टी कडून आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे. यावरून जनतेला काय सांगू इच्छितात एकीकडे सरकार आपली. कंत्राटदार आपले, सत्ता आपली आणि आंदोलन करण्याची भूमिका. अशी म्हणण्याची वेळ आली 'बगल मे सुरा आणि गाव मे डिंडोरा!