जिल्हा परिषदेच्या अभियांत्रिकी कामात ई-अंदाजपत्रक व ई -मोजमाप पुस्तिका प्रणाली लागू करा-सुहास धारासुरकर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- २५/८/२०२४
चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने त्रीमासिक सभा घेण्यात आली. राज्यातील 28 जिल्ह्यातील प्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित होते. संघटनेच्या सर्व कामाच्या अडीअडचणी येतात त्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना संदर्भात माहिती सर्व जिल्हा परिषद च्या अभियंतांना अवगत करण्यासाठी चंद्रपूर येथील प्रिन्स सेलिब्रेशन हॉल येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पत्रकारांना माहिती देताना राज्याचे राज्याध्यक्ष श्री सुहास धारासुरकर यांनी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा परिषद अजूनही अभियंत्याकडून ऑफलाइन कामकाज केल्या जाते.
त्यामुळे अभियंत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला.
राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ई-अंदाजपत्रक व ई-मोजमाप पुस्तिका प्रणाली लागू न केल्यास, दिनांक 15 ऑगस्ट 2024 नंतर जिल्हा परिषदेचा कोणताही अभियंता, पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन) अंदाजपत्रक तयार करण्याचे व मोजमाप पुस्तिका लिहिण्याचे कामकाज करणार नाही, असा संघटनेच्या राज्य कार्यकारणीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने संदर्भीय 3 च्या पत्रांन्वये शासनास निवेदन सादर करण्यात आले आहे.
राज्यभरात जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता व समानता असावी, तसेच कामामध्ये गतिमानता व पारदर्शकता यावी यासाठी, सर्व जिल्हा परिषदांमध्ये उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने तात्काळ ई-अंदाजपत्रक व ई-मोजमाप पुस्तिका प्रणाली लागू करण्यात यावी. तसेच जिल्हा परिषद मध्ये 60 टक्के पदे रिक्त आहेत ते शासन निर्णयानुसार भरण्यात यावी. प्रत्येक विभागात उप अभियंता व विद्युत विभागात उपअभियंता अशा पदाची भरती करावी.
त्यामुळे राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये प्रचंड मोठी तफावत दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेतील इतर सर्व कामकाज अत्याधुनिक ई-प्रणालीने होत असताना, केवळ अभियंत्यांकडील तांत्रिक कामकाज ऑनलाईन करणे बाबत मात्र प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
या संदर्भाचे पत्र पालकमंत्री यांनाही देण्यात आले आहेत. तत्वतः जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी यांनाही या संदर्भाची माहिती दिली असून त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या मागण्याची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती.
सुहास धारासूरकर,हुपरे,सचिन चव्हाण,
कालिदास ढवळे,प्रकाश तांबोळी,संजय उगमगे,संजय कोहडे, यांनी पत्रकार परिषदेतून सांगितली.