कुख्यात डॉन हाजी अली गोळीबारात ठार! एका अध्यायाला पूर्णविराम !



कुख्यात डॉन हाजी अली गोळीबारात ठार! एका अध्यायाला पूर्णविराम !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने गोळीबाराच्या घटना होत आहेत. अवैद्य धंद्याचे माहेरघर असलेल्या आणि कोळसा तस्करीत डॉन समजणाऱ्या कुख्यात हाजी अलीवर आज चंद्रपूर शहरातील बिंनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना सात अज्ञात आरोपीने गोळ्या झाडल्याने गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
जुन्या दुश्मनीतून हाजी अली याच्यावर आरोपींनी आपल्या बंदुकीतून गोळ्यांच्या फायरी केल्या
हाजी अली याचे नुकताच कारागृहातून सुटका झाल्याचे कळते, हाजी अली यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता. त्याच्या अनेक गुन्हे दाखल होते. गुन्हेगारीतला बादशहा म्हणून त्याची ओळख ही होती. त्यामुळे चंद्रपुरातील वाढत असलेल्या गुन्हेगारीतील एक
अध्याय समाप्त झाल्याचे बोलल्या जात आहे. हाजी अलीची हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.