जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी! स्थानिक गुन्हे शाखेचे काम काय ?



जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी! स्थानिक गुन्हे शाखेचे काम काय ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पोलीस विभागात एक महत्वाचे विभाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखा ही कार्यरत आहे .चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकासह इतर उप पोलीस निरीक्षक आणि कार्यरत असलेले पोलीस पथकचे काय काम असतात ?
स्थानिक गुन्हे शाखेकडे जिल्ह्यातील 15 तालुक्याच्या पोलीस स्टेशनचे काम मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हेगारातील क्रिमिनल रेकॉर्ड, गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम ,गुन्हे शोध घेण्याची मुख्ख जबाबदारी ही या विभागावर असते.
जिल्हा पोलीस अधीक्षकाचे काम उल्लेखनीय असून पोलीस अधीक्षक स्वतः ग्राउंड लेव्हल व काम करीत आहे. स्थानिक पातळीवर पोलीस निरीक्षक आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने करीत असतात.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस निरीक्षकाचे जिल्ह्यात एकच पद असल्याने त्यांच्यावरचा वाढता ताण पाहता. अजून दोन पोलीस निरीक्षकाची आवश्यकता असावी! तर नाही ना!
परंतु राजकीय वरदस्त आणि काही चुगलबाज अधिकाऱ्यामुळे पोलीस विभागातील कर्तुत्वान अधिकारी आपल्या कर्तव्यापासून दूर राहतात.
जिल्ह्याच्या अनेक पोलीस ठाण्यात चांगल्या पोलीस निरीक्षकांची अजूनही काही कमी नाही. परंतु राजकीय वरदस्थाखाली आणि पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या चुगलपणामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना अजूनही वाव मिळत नाही. पोलीस हतास आहे.
जिल्ह्यात काही दिवसापासून गुन्हेगारीचा विस्फोट होत आहे.
अटल गुन्हेगार कारागृहातून आल्यावर आणि चंद्रपुरातील बारीक-सारी गुन्हेगारीवर सूक्ष्म नियंत्रण ठेवण्याचे काम हे गुन्हे शाखेवर असते. चंद्रपुरात आतापर्यंत बॉम्बस्फोट, बंदुकामधून गोळ्या ,चाकु,तलवारी, अशा हत्यारांचा मोठ्या प्रमाणात गुन्हेगाराकडून वापर करण्यात आला . दारू साठा जप्त करण्यात आला. मात्र चंद्रपूर स्थानिक गुन्हेच्या पोलिसांकडून छोट्या-मोठ्या घटनेमध्ये व्यर्थ घसीटल्या जातात. रेती, दारू, जुवा, छोट्या-मोठ्या चोरी तील घटना ,अपघात अशातच स्थानिक गुन्हे शाखेची मरगळ सुरू असते . दुसरीकडे पोलीस पथकावर तहान वाढला जातो.
चंद्रपुरात जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून वाढत्या गुन्हेगारीचा विस्फोट होताना दिसून येत आहे. खून ,दरोडे बॉम्बस्फोट,दारूची तस्करी, लखमापूर पाईप चोरी, रेती तस्करांना वलय, अशा अनेक अवैद्य धंद्यांना गुन्हेगारीला साथ देणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची मूक सहमती आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
सध्या  चंद्रपुरातील  गुन्हेगारी पार्श्वभूमीवर
   वरिष्ठ स्तरावरून चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची चौकशी करावी. चंद्रपुरातील वाढत्या  गुन्हेगारीला आळा घालावा यासाठी  येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चांगल्या अधिकाऱ्यांची  वरणी लागावी अशी चंद्रपूरकरांची मागणी आहे.  महाराष्ट्रात चंद्रपूर पोलिसांची कामगिरी शून्याकडे चालली का?. गुन्हेगारी रोखण्यास जिल्ह्यातील पोलीस विभाग  अक्षरशः फेल आहे का?