... एवढा घमंड चांगला नाही,
रावणाचाही अहंकार संपला... !
परिवारातच टिकिटिसाठी माया जाळ...!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या काही वादग्रस्त विधानाची चर्चा आता सर्वीकडे होऊ लागली आहे. धानोरकर परिवाराच्या राजकीय वारसा राबलेल्या कुटुंबात साध्या गृहीणी असणाऱ्या . पतीचा राजकीय वारसा घेऊन राजकारणात सुरुवात करण्यास स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या मोलाचा वाटा त्यांच्या राजकीय कार्यशक्तीला लाभला. आणि तिथूनच त्यांची सुरुवात झाली. आणि त्या वरोरा भद्रावती विधानसभेच्या आमदार ठरल्या. अशातच चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर लोकसभा लढवण्याचा त्यांनी पवित्रा घेतला. त्यात त्या २ लाख 60 हजाराच्या वर भरघोस मतानी विजयी झाल्या. त्यात त्यांना लोकांची सहानुभूती, गटा तटाच्या सर्व राजकीय नेते यांची साथ मोलाची ठरली.जातीय समीकरण, कुणबी समाजाचे मोलाचे सहकार्य, आणि मुनगंटीवारांच्या विरोधात असलेले वातावरण, आणि मुळातच इच्छा नसताना पक्षाचा आदेश म्हणून सुधीर मुनगंटीवारांनी स्वीकारलेले रण त्यांना पेलले नाहीत. ती सहानुभूती प्रतिभा धानोरकरांना मिळाली. परंतु पक्षातच खिंडाळ पाळण्याचे वक्तव्य आणि पक्षातील वातावरण बोचके करण्याच्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चा होत आहे.
का ही दिवसापूर्वीच ब्रह्मपुरी येथे कुणबी समाजाच्या मेळाव्यात आपल्याच पक्षातील नेत्यांना ड्युचून वादग्रस्त विधान करून आता अल्पसंख्याकांना या ठिकाणी थारा देऊ नये. असे विधान केल्याने अल्पसंख्यांकाच्या मनाला ठेच पोहचवी आहेत. कारण खासदार प्रतिभा धानोरकर हा सर्व समाजाच्या स्तरातील लोकांच्या मतदानावर निवडून आले आहेत. पक्षातील लोकांना डीवचने, विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना वारंवार मस्ती उतरवण्याची भाषा करणे, जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मीच तिकीट वाटप करणार असे वक्तव्य करणे. जे की पक्षातील वरिष्ठ हाय कमांड कडे सर्व अधिकार असताना तिकीट वाटपाचं घोंगड पांघरून घेणे आणि मीच करीन ती पूर्व दिशा म्हणून पक्षातच कलह निर्माण करणे यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पडोळे यांनीही समज दिल्याचे समजते. राजुरा येथील एका कार्यक्रमात निवडणुकीत लक्ष्मी म्हणजे पैसा असे सांगितले. लक्ष्मी येते तिला स्वीकारा आणि मतदान करा! अशा वादग्रस्त विधानाने काँग्रेसची प्रतिमा मल्लिंतर झालीच! परंतु विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.
लोकसभा निवडणुकीत निवडून येताच काही दिवसातच एवढा घमंड चांगला नाही? याचे पडसाद जनतेत उमटू लागले आहेत. आता सर्वीकडे अशा वादग्रस्त विधानाची चर्चा होत असतानाच आता तर घरातच परिवार वाद उफाळून येत आहे. भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले अनिल धानोरकर यांनी होणाऱ्या विधानसभेत आपल्यालाच काँग्रेसची तिकीट मिळावी म्हणून रणकंद फुकले आहेत. परंतु खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भाऊ प्रवीण काकडे याला तिकीट भेटावं म्हणून आग्रही असल्याची चर्चा विधानसभा क्षेत्रात होत आहे.
भावाची वादग्रस्त प्रतिमा असून एका खाजगी कोळसा कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहार करण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. त्यामुळे धानोरकर परिवारावर खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अनेक कार्यक्रमात खास करून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीत वारंवार मस्ती उतरवण्याचे खोचक विधाने केल्याने चंद्रपुरात भाजप पक्षाकडून निषेधही नोंदवण्यात आला. असे म्हटले जाते की,
ज्या वेगाने दगड उंच कारल्या जातो,त्याचा अधिक वेगाने खाली पडल्या जातो .याची जाणीव खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना व्हायला हवी. ही जनता आहे. सर्व काही समजते. कारण रावणाचाही अहंकार संपुष्टात आला होता ?