२८ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताह




२८ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताह

दक्षता जनजागृती सप्ताह २०२४' (Vigilance Awareness Week)

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे' (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. सन २०२४ मध्ये दि. २८ ऑक्टोबर २०२४ ते ०३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताह २०२४' साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त शासन निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयातर्फे 'सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी' (Culture of Integrity for Nation's Prosperity) हि संकल्पना घेवून विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आज दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोज स. ११/०० वा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत शपथ तसेच मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्तानिमित्त दिलेला संदेश वाचून पुढील
कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे व तसेच पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसार माध्यमांद्वारे भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात 'लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे' असे फलक लावणे आवश्यक असुन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर, टोल फ्री नंबर लिहीणे आवश्यक आहे. अशा सुचना शासकीय कार्यालयांना दिल्या आहे. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात जनतेला सहभागी करून घेण्याकरीता त्यांचेकडे 'भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या सरकारी नोकरांविरूध्द (अधिकारी/कर्मचारी) तक्रार असल्यास नागरीकांनी प्रत्यक्ष खालील पत्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.' असे आवाहन करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विभागाकडून करण्यात आले आहे,
चंद्रपूर कार्यालयाचा :-पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर,
हुतात्मा स्मारकच्या मागे, सिव्हील लाईन, चंद्रपूर. ४४२४०१लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयाचा संपर्क क्रमांक :-कार्यालयीन दुरध्वनी क्र. टोल फ्री क्रमांक.श्रीमती. मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक
श्री. जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक
ई-मेल
वेबसाईट०७१७२-२५०२५१,१०६४
९३२२२५३३७२,८८८८८५७१८४ हा नंबरशी संपर्क साधावा.