प्रशासन व्यस्त ,रेती तस्कर मस्त! जिल्ह्यातील ६५ रेती घाटाचे काय ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुकल्या जात आहे. सर्व विभा अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच फायदा घेऊन रेती तस्करांनी आपला मोर्चा सध्या रेती घाटावर वळवला आहे. अवैध्य रेतीचा महापूर चंद्रपूर शहरात पहाटेला चार वाजता पासून शहरात अवैध रेती घाटावरून पुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील 2023 ते 2024 करिता 65 रेती घाटांची आणि 30 वाळू डेपो करिता ही निविदा पद्धतीने मागवण्यात आल्या होत्या. करिता जिल्ह्यातील 103 निविदाधारकांनी 65 रेती घाटा करिता आपली अमानत रक्कम जमा केली होती. परंतु शासनाने हे सर्व रेतीघाट रद्द केल्याची माहिती असून त्यांची अनामत रक्कम सुद्धा वापस करण्यात आली असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील खनी कर्म विभागाकडून लिलाव हे रद्द करण्यात आले असून. त्या लिलाव झालेल्या घाटाचे अनामत रक्कम सुद्धा घाटधारकांना वापस करण्यात आली असल्याची सूत्राची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एका दुःखा रेती घाटाचा उपसा सुरू असताना. जिल्ह्यातील सर्रास अनेक रेती घाटातून अवैध्य उपसा सुरू आहे. त्या रेतीचा पुरवठा सुद्धा चंद्रपूर शहरात राजरोसपणे होत आहे.
त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुळत आहे .
एकीकडे शासनाने 600 रुपयात घरकुलधारकांना एक ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची ऑनलाईन नोंदणी सुद्धा काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. परंतु ती नोंदणी फक्त ती ऑनलाईनच राहिली. कुठल्याही घरकुलधारांना त्या रेतीचा एक ब्रास सुद्धा मिळाला नाही. अशी ओरड सर्वसामान्य नागरिकासह घरकुलधारकात होत आहे. परंतु ऐवद्य रीतीने येणारा रेतीचा असा पुरवठा सर्रास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक हायवा 40 ते 50 हजार, हाफ टन वीस ते पंचवीस हजार
, आणि ट्रॅक्टर आठ ते दहा हजाराच्या वर विक्री केल्या जात असल्याची सर्वसामान्य माणसात चर्चा आहे. हा बृदंड सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
जिल्ह्यातील सर्व महसूल विभागातील कर्मचारी, खणीकर्म विभागातील कर्मचारी, जिल्हा प्रशासन सर्व विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असण्याचा फायदा सध्या रेती तस्करानी उचलला असून बिनधास्तपणे रोज रात्रीला खेळ रेती तस्करांचा सुरू असतो. मात्र यामुळे शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसूल जिल्ह्यात बुडत असून आता प्रशासन व्यस्त आणि रेती तस्कर मस्त अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कुठलाही वाली नसल्याने रेती तस्करांचे मनोबल उंचावले आहे. सर्व सामान्य माणसांची लूट होत आहे.