विधानसभेत झालेल्या मतदानात 100% ईव्हीएम चा घोळ- अपक्ष उमेदवार प्रकाश मारकवार यांचा आरोप
बैलेट पेपर वर मतदान घेण्याची मागणी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर.:- chandrapur
नुकताच विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा चा निकाल घोषित झाला. निवडणुकीत 6 विधान क्षेत्रा पैकी 5 विधानसभाक्षेत्रात भाजपा उमेदवार तर 1 विधानसभाक्षेत्रात कांग्रेस उमेदवार विजयी झाले. परंतु या निवडणूकीत काही क्षेत्रातील अनपेक्षित निकाल बघता मतगणना मध्ये 100 टक्के ईव्हीएम चा घोळ झाल्याचा आणि अपक्ष उमेदवारांचे मत भाजपा आणि कांग्रेस यांचेकडे वळविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रपरीषदेत केला. यासंदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असुन ईव्हीएम मशीन विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला.
मारकवार म्हणाले की, ते 30 वर्षापासून राजकारणात कार्यरत आहे. वर्ष 1990 मध्ये पहली विधानसभा निवडणूक लढविली. त्यांवेळी बैलेट पेपर वर मतदान घेण्यात येत होते. त्यावेळी मुल सावली विधानसभा क्षेत्रातुन 6000 मत घेतली होती. वर्ष 1992_97 मध्ये जिल्हा परीषद अध्यक्ष झाले. वर्ष 2009_14 दरम्यान जिला परीषद सदस्य राहीले. संपूर्ण कारकिर्द राजकारण आणि समाजकारणात घालविली आहे. आता विधानसभा 2024 मध्ये ही बल्लारपुर_मूल मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार म्हणून उभा होतो. यावेळी मतगणना मध्ये फक्त 322 मते दाखविण्यात आली. परंतु पैतृक गांव राजगड 1000 च्या वर लोकवस्तीचे गांव आहे. गांवात विचारणा केली असता राजगड गांवातच 300 मत मिळाल्याची दाट शक्यता यावेळी त्यांनी वर्तविली. 1000 च्या वर कार्यकर्ता निवडणूकीच्या कामाला लागले होते. या निवडणूकीत घेतलेली मेहनत आणि लोकांसोबत केले संपर्क व त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद बघता 30 हजार च्या वर मत मिळण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तविली. अंतिम निकाल शीट वर फक्त राजगड गांवामध्ये 25 मत मिळाले आहे. बाकि अन्य ठीकाणी 0_1_1_0 असेच मत मिळाले आहे. यावेळी मारकवार यांनी अपक्षांचे मत भाजपा व कांग्रेस कडे वळविल्याचा आरोप ही यावेळी केला आहे. काही विधानसभा क्षेत्रा मध्ये मतगणना चा अनपेक्षित निकाल बघता 100 टक्के ईव्हीएम मशीन चा घोळ झाल्याचा आरोप मारकवार यांनी पत्रपरीषदेत केला आहे. याप्रकारच्या मतदानाने लोकशाही ध्योक्यात येत आहे. अन्य अपक्ष उमेदवारानी सोबतच नागरीकांनी समोर येऊन ईव्हीएम मशीन विरोधात जोरदार आवाज बुलंद करून बैलेट पेपर वर मतदान घेण्याची मागणी करायला हवी. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहीती प्रकाश मारकवार यांनी दिली.